Solapur Crime : जयंतीची वर्गणी जबरदस्तीने मागणे भोवले

सोलापुरात व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा.
Crime
Crimesakal

सोलापूर - मी एन. भाईच्या वतीने (नागेश प्रकाश इंगळे) जयंती उत्सवाच्या वर्गणीची पावती देण्यासाठी आलो आहे असे म्हणून सोलापुरातील ७० फूट रोडवरील समर्थ ज्वेलर्सचे मालक अमिन शेख यांच्याकडे दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या राम अशोक जाधव व नागेश प्रकाश इंगळे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

जयंती उत्सवाच्या अनुषंगाने समर्थ ज्वेलर्सचे मालक अमीन शेख यांच्याकडे छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था हुडको नंबर - ३ चे पदाधिकारी राम जाधव व इतर दोन लोक आले होते. या पदाधिकाऱ्यांनी शेख यांच्याकडे दोन हजाराची पावती दिली. त्यावेळी शेख म्हणाले आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आमच्या असोसिएशनकडे वर्गणी जमा केली आहे.

तुम्ही त्यांच्याकडून वर्गणी घ्या किंवा त्यांच्याशी फोनवर बोला, त्यावेळी राम जाधव म्हणाला, मी कोणाशीही फोनवर बोलणार नाही. तुम्हाला जयंतीची वर्गणी द्यावीच लागेल. तुमच्या अध्यक्षाला एन. भाईकडे पाठवून द्या. ही पावती तुम्हाला घ्यावीच लागेल असे म्हणून शेख यांच्याकडे पावती देऊन तो पदाधिकारी निघून गेला.

या घटनेबाबत व्यापारी असोसिएशन यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बझार पोलिस ठाण्यात नागेश प्रकाश इंगळे व राम अशोक जाधव यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. नागेश प्रकाश इंगळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्तांनी त्याला २०१९ मध्ये एक वर्षासाठी स्थानबद्ध केले होते. त्यानंतर २०२१ मध्ये त्याला एक वर्षाकरिता सोलापूर शहर हद्दीतून तडीपार देखील केले होते.

सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजित लकडे म्हणाले, अशा प्रकारच्या गुंडांना मंडळात सहभागी करून त्यांच्या माध्यमातून जयंती उत्सव वर्गणी जबरदस्तीने घेतली जात असल्याचे दिसत आहे. सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे.

अशाप्रकारे जबरदस्तीने धमकावून वर्गणी मागितल्यास पोलिस प्रशासनाकडून त्वरित कारवाई केली जाईल. जबरदस्तीने वर्गणी गोळा केली जात असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही वरिष्ठ पोलिस निरीक्षक लकडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com