

BJP leaders in Solapur break coconut to mark the start of candidate selection; party begins accepting applications for Nagar Parishad polls.
Sakal
सोलापूर: भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक जिल्हा व महापालिका क्षेत्रनिहाय निवडणूक प्रमुख व प्रभारींची नियुक्ती करत महायुतीतील घटक पक्षांना शह दिला आहे. त्यानंतर नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्रक्रियेचा नारळ फोडत मित्रपक्षांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एक नगरपंचायतीसाठी शुक्रवारपासून (ता. ७) तीन दिवस इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.