Solapur News : भाजपने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना कोणतीही ऑफर दिली नाही ; चंद्रशेखर बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; इतर पक्षातील इच्छुकांचे मात्र स्वागत
solapur
solapur sakal

सोलापूर : भाजपने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना कोणतीही ऑफर दिली नाही. त्याची पक्षाला आवश्यकताही नाही. मात्र, कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारून पक्षात आल्यास त्यांचे स्वागत केले जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता. १७) येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

चुकीच्या बातम्या येत असल्याचे सांगून ते म्हणाले, सुशीलकुमार शिंदे हे चांगले मित्र आहेत, पारिवारिक संबंध आहेत. भेटी होणे हा वेगळा विषय आहे. मध्यंतरी दोन तीन वेळा भेटी झाल्या आहेत. कोणी आमचा दुपट्टा घालायला तयार असेल स्वागत आहे. जगातील सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदी यांच्यात आहे. त्यामुळे मी शरद पवारांना सोडून भाजपसोबत आल्याचे सांगितले. तसे कोणाची तयारी असेल तर यावे. आम्ही कोणालाही आमदारकी, खासदारकी घ्या, असा कोणताही शब्द देणार नाही.

तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांनी दिलेला निर्णय योग्य आहे. कायद्याच्या सर्व बाजू पडताळूनच निर्णय दिला आहे. तो विधानसभेच्या परंपरा, निर्णयाला धरून आहे. त्यांनी ठाकरे गटाला उत्तरही दिल्याचे त्यांनी म्हटले.

सोलापूरच्या समस्या सोडविणारा उमेदवार

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या समस्या सोडविणारा उमेदवार मिळेल, असे सांगून बावनकुळे म्हणाले, उमेदवारीचा निर्णय पक्षाचा केंद्रीय संसदीय मंडळ घेईल. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार हे नेते जिंकण्यासाठी कोणती जागा कोणी घ्यायची याचा निर्णय करतील. त्यानंतर संसदीय मंडळ निर्णय घेईल.

ठाकरे, राऊत,

आव्हाडांवर पलटवार

उद्धव ठाकरे यांनी १२ सभांमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे सांगितले होते. तर संजय राऊत यांनीही अनेकदा नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तेव्हा युती होती, त्यामुळे अमित शहा ठाकरेंच्या भेटीला गेले होते. त्यांनी आमच्याशी गद्दारी केली, त्यांची अवस्था आणखी बिकट होईल. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर त्यांना उमेदवार मिळणेही कठीण होईल, असा पलटवार बावनकुळे यांनी केला. तसेच जितेंद्र आव्हाड हे स्टंटबाज असल्याचे म्हटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com