

Major Political Twist in Solapur: BJP’s 12 Candidates Shake Up Mohite-Patil Empire
Sakal
सोलापूर: जिल्ह्यातील ११ नगरपालिका व एक नगरपंचायत अशा सर्व १२ नगराध्यक्ष पदासाठी भाजपने पहिल्यांदाच ''कमळ'' चिन्हावर उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यातील सात ठिकाणी मूळ भाजपच्या तर पाच ठिकाणी आयात उमेदवारांना संधी दिली आहे. अकलूजमध्ये स्वतंत्र पॅनेल उभे करत मोहिते - पाटील यांच्या साम्राज्याला थेट आव्हान दिले असून सांगोल्यात ऐनवेळी शेकापचा उमेदवारच हायजॅक करण्याच्या यशस्वी राजकीय खेळीनंतर शेकापचाही पाठिंबा मिळवला आहे. तर अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांना उमेदवारी दिली आहे.