esakal | भाजपची सांगोला तालुका जम्बो कार्यकारिणी जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपची सांगोला तालुका जम्बो कार्यकारिणी जाहीर

सोलापूर रेल्वे मंडल समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

भाजपची सांगोला तालुका जम्बो कार्यकारिणी जाहीर

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे :

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली 700 जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रत्येक आघाडी, सेल, मोर्चामध्ये 60 सदस्यांची नियुक्ती केली आहे. सोलापूर रेल्वे मंडल समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

हेही वाचा: मोठी बातमी! राज्यातील निर्बंध पूर्णपणे उठणार

यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, जयकुमार शिंदे, अभिजित निंबाळकर (फलटण), संभाजी आलदर, अंबुरे, शिवाजीराव गायकवाड, राजश्री नागणे, नवनाथ पवार, दत्ता टापरे, अभिजित नलवडे, गजानन भाकरे, संजय केदार, अनिल कांबळे, जयंत केदार, संजय गंभीरे, वसंत सुपेकर, मानस कमलापूरकर, विलास व्हनमाने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: सावधान! महिला चोरट्यांकडून कपड्याच्या दुकानात डल्ला

सांगोला तालुक्‍याची भाजपची जम्बो कार्यकारिणी पुढीलप्रमाणे, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, उपाध्यक्ष डॉ. विजय बाबर (कडलास), अभिमन्यू पवार (महूद), गणेश कदम (धायटी), दिलीप सावंत (हंगिरगे), संग्रामसिंह गायकवाड (कडलास), धान्नाप्पा गावडे (जवळा), कृष्णदेव इंगोले (एखतपूर), सरचिटणीस शिवाजी ठोकळे (कडलास), संतोष पाटील (नाझरे), मधुकर पवार (वाटंबरे), युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर (जुजारपूर), उपाध्यक्ष - दत्ता चव्हाण (चिंचोली), राहुल व्हनमाने (जुनोनी), विक्रम नवले (एखतपूर), विशाल कुलकर्णी (बामणी), सरचिटणीस - ओंकार कुलकर्णी (सांगोला), रमाकांत गुरव (हातीद), ओबीसी सेल मोर्चा तालुकाध्यक्ष - शिवाजी आलदर (कोळे), सरचिटणीस - शंकर खरात (चिंचोली), गणेशलवटे (कडलास), उपाध्यक्ष - सचिन गडदे (चिंचोली), सचिन पांढरे (गौडवाडी), अनुसूचित जाती मोर्चा सांगोला तालुकाध्यक्ष तानाजी कांबळे (जुनोनी), बाळासाहेब गाडे (जुजारपूर), उपाध्यक्ष संभाजी चव्हाण (वासूद), देविदास कांबळे (बागलवाडी), सरचिटणीस राहुल मंडले (हातीद), दगडू कांबळे (गौडवाडी), किसान मोर्चा तालुकाध्यक्ष - बाळाप्पा येलपले (य. मंगेवाडी), उपाध्यक्ष नंदकुमार रायचुरे (नाझरे), सरचिटणीस - अनिल भोसले (खवासपूर), अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष मिर्झागालीब मुजावर (मांजरी), उपाध्यक्ष - फैजुद्दिन शेख (बलवडी), आरिफ तांबोळी (सांगोला), सिंकंदर मुजावर (मांजरी), सरचिटणीस - इब्राहीम मुलाणी (महूद), बालम पटेल (देवळे), अनुसूचित जमातीमोर्चा तालुकाध्यक्ष - विजय ननवरे (कडलास), उपाध्यक्ष - दत्तात्रय आहुले (सावे), अण्णा माने (सावे), नितीन जाधव (सावे), सरचिटणीस - संभाजी माने (सावे), रेवण माने (सावे), महिला मोर्चा तालुकाध्यक्ष - मनीषा आलदर (उदनवाडी), उपाध्यक्ष - जयश्री जंगम (वाणीचिंचाळे), अर्चना सुर्यागण (चिंचोली), आशा लिगाडे (चिणके), सरचिटणीस - लतिका जाधव (खवासपूर), आश्विनी गायकवाड (वाढेगाव), सांगोला शहर युवामोर्चा अध्यक्ष - प्रवीण जानकर (सांगोला), उपाध्यक्ष - मयुरेश गुरव (सांगोला), सांगोला शहर प्रसिद्धीप्रमुख - सुर्यकांत इंगोले (सांगोला), सांगोला शहर अल्पसख्यांक मोर्चा अध्यक्ष - वासिम शेख (सांगोला), डॉक्‍टर सेल सांगोला तालुका संयोजक - परेश खंडागळे (सोनंद), व्यापारी आघाडी सेल सांगोला तालुका संयोजक - शशिकांत येलपले (य. मंगेवाडी), व्यापारी आघाडी शहर संयोजक - प्रवीण इंगोले, उद्योग आघाडी सेल सांगोला तालुका संयोजक - श्रीनिवास क्षीरसागर (नाझरे), सांगोला तालुका सोशल मीडिया सेल संयोजक - गणेशदिघे (वाढेगाव).

loading image