esakal | मोठी बातमी! राज्यातील निर्बंध पूर्णपणे उठणार
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी! राज्यातील निर्बंध पूर्णपणे उठणार

जमेची बाजू म्हणजे राज्य सरकारने तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभाग सक्षम केला असून ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरसह अन्य साधनसामुग्रीची व्यवस्था केली आहे.

मोठी बातमी! राज्यातील निर्बंध पूर्णपणे उठणार

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्यातील बहुतेक शहर-ग्रामीणमधील कोरोना (Corona) रुग्णसंख्या (Number of patients) आटोक्‍यात आल्याने निर्बंध शिथिल करून सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत तर बार, हॉटेल रात्री 11 पर्यंत सुरु ठेवली जाणार आहेत. हातावरील पोट असलेल्यांसह व्यावसायिकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे राज्याची आर्थिक स्थितीदेखील बिकट झाल्याने निर्बंध शिथिलतेसंदर्भात बुधवारी (ता. 21) बैठक होणार आहे. गुरूवारनंतर निर्बंध शिथिल होतील, असे आपत्ती व्यवस्थापनातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 199 शाळा मुख्याध्यापकांविनाच !

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर डेल्टा प्लसमुळे राज्यातील निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले. परंतु, बहुतेक शहर-जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग कमी झालेला असतानाही सर्वत्र कडक निर्बंध लागू केल्याने महाविकास आघाडी सरकारविरोधात नाराजीचा सूर आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसमधील काही मंत्र्यांनी निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. दरम्यान, राज्यातील उल्हासनगर, मिरा भाईंदर, नाशिक, जळगाव, सोलापूर या महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या खूपच कमी झाली आहे.

हेही वाचा: सातारा-सोलापूर रेल्वेसाठी खासदार उदयनराजेंना साकडे

तसेच चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, नंदूरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या मागील 16 दिवसांत वाढलेली नाही. तसेच राज्यात 17 दिवसांत राज्यभरात सव्वालाख रुग्ण वाढले असून ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या जुलैमध्ये साडेपंधरा हजाराने कमी झाली आहे. जमेची बाजू म्हणजे राज्य सरकारने तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभाग सक्षम केला असून ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरसह अन्य साधनसामुग्रीची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद

'या' जिल्ह्यांमधील निर्बंध कायम

राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये 1 ते 17 जुलै या कालावधीत रायगड, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग, रत्नागिरी व बीड या जिल्ह्यांमध्ये अडीच हजार ते नऊ हजारांपर्यंत रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे या ठिकाणचे निर्बंध आणखी काही दिवस तसेच ठेवले जाणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईत 43 हजार तर पिंपरी चिंचवडमध्ये साडेतीन हजार, ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेल, वसई विरारसह रायगड, नगर या ठिकाणी बाराशे ते दीड हजारांपर्यंत रुग्णवाढ झाली आहे. त्यामुळे तेथील निर्बंध शिथिल करायचे की जैसे थे ठेवायचे, यासंदर्भात रविवारी आपत्ती व्यवस्थापनाची टास्क फोर्ससमवेत बैठक होणार आहे.

हेही वाचा: रेल्वे विद्युतीकरणाचा "फास्ट ट्रॅक'! सोलापूर विभागाचे काम अंतिम टप्प्यात

निर्बंध लवकरच होतील शिथिल

राज्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी वाढत असून त्यासंदर्भात महत्त्वाची बैठक आहे. बुधवारपर्यंत मुख्यमंत्री निर्बंध शिथिलतेबाबत निर्णय जाहीर करतील. ज्या शहर-जिल्ह्यांमधील रुग्ण कमी झाले आहेत, त्याठिकाणचे व्यवहार पूवर्वत करण्याचे नियोजन आहे.

- श्रीरंग घोलप, अव्वर सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई

loading image