बारा आमदार निलंबनाबाबत भाजपने केला महाविकास आघाडी सरकारचा निषेध

बारा आमदार निलंबनाबाबत भाजपने केला महाविकास आघाडी सरकारचा निषेध
Bjp Agitation
Bjp AgitationCanva

नातेपुते येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

नातेपुते (सोलापूर) : हे सरकार बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पूर्ण विरुद्ध विचाराने चालत आहे. 12 आमदारांचे निलंबन हे मोठे कारस्थान आहे. सत्ताधारी पक्ष विकासकामे सोडून आमदारांना निलंबित करणे, विकासकामांच्या अडवणुका करणे यामध्ये व्यस्त आहे, अशी टीका माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते- पाटील (Arjun Singh Mohite-Patil) यांनी केली. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या (BJP) बारा आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आज नातेपुते येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात रस्ता रोको आंदोलन (Agitation) करण्यात आले. त्या वेळी अर्जुनसिंह मोहिते- पाटील बोलत होते. (BJP staged agitation at Natepute against the Mahavikas Aghadi government)

Bjp Agitation
श्‍वानांचे लसीकरण आवश्‍यकच! जाणून घ्या "रेबीज'ची लक्षणे व घ्यावयाची दक्षता

या आंदोलनात सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नातेपुते गावचे माजी सरपंच, समता परिषदेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष भानुदास राऊत, धनगर आरक्षण कृती समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हनुमंत सूळ, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, उपाध्यक्ष प्रवीण काळे, सोलापूर जिल्हा ओबीसी सेलचे बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, एकनाथ ननवरे, शशिकांत कल्याणी, शहराध्यक्ष देविदास चांगण, संजय उराडे, हभप पिंटू महाराज भगत, राहुल पद्मन, महेश सोरटे, मंगेश दीक्षित, हनुमंत कर्चे, संजय गांधी, महेश शेटे, अतुल बावकर, जया चिंचकर आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी पुणे- पंढरपूर रोडवर रास्ता रोको आंदोलन केले.

या वेळी तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर म्हणाले, हे सरकार लोकशाहीचे नसून मोगलाईसारखे वागत आहे. एमपीएससीच्या परीक्षा घेतल्या जात नाहीत. परीक्षा झालेल्या मुलांची नियुक्ती होत नाही. अकलूज नगर परिषद, नातेपुते नगरपंचायतीचा शेवटचा अध्यादेश जाणीवपूर्वक काढला जात नाही. अकलूज येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषणाचा चौदावा दिवस आहे तरीही सरकारला काही वाटत नाही.

Bjp Agitation
वेड्या बहिणीची वेडी माया ! बहिणीने भावाला किडनीदान करून दिले जीवदान

बाळासाहेब सरगर म्हणाले, आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी माळशिरस तालुक्‍यातील तमाम जनता आहे. त्यांनी या सरकार विरुद्ध जो आवाज उठवला आहे त्याला जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे.

हनुमंत सूळ म्हणाले, आज शेतकरी अडचणीत आहे. शेती वीजपंपाचे वीजबिल माफ झाले पाहिजे. शेतीचे कर्ज अनेकांचे अद्याप माफ झालेले नाही. एमपीएससीच्या मुलांच्या नियुक्‍त्या रखडलेल्या आहेत. दिशाहीन सरकार आहे. यांच्यामुळेच ओबीसींचे आरक्षण गेलेले आहे.

प्रमुख पाहुणे अर्जुनसिंह मोहिते- पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांनी खंबीरपणे या सरकारच्या विरुद्ध लढण्यासाठी उभा राहणे गरजेचे आहे. आज संपूर्ण जगात भारताची मान पंतप्रधान मोदी यांनी उंच केलेली आहे. असे असताना महाराष्ट्रात मात्र वारकऱ्यांना पताका घेऊन चालू दिले जात नाही. युवकमित्र बंडातात्या कराडकर यांसारख्या संतांना बंदिवान बनवले आहे. हे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्ण विरुद्ध विचाराने चालत आहे. 12 आमदारांचे निलंबन हे मोठे कारस्थान आहे. या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. विकासकामांसाठी या सरकारचे कुठलेही धोरण नाही. फक्त लोकांची अडवणूक करणे हेच त्यांचे काम आहे.

मंडलाधिकारी संदीप चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी गावकामगार तलाठी प्रभाकर उन्हाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com