bjp will solve koli community problem says mla ramesh patil
bjp will solve koli community problem says mla ramesh patilSakal

Solapur News : भाजपच सोडवेल कोळी समाजाचे प्रश्न - आमदार पाटील

देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात सक्षम पर्याय आहेत. भाजपची सत्ता आल्यास कोळी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असा विश्वास आहे.

सोलापूर : देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात सक्षम पर्याय आहेत. भाजपची सत्ता आल्यास कोळी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असा विश्वास आहे. त्यामुळे कोळी महासंघाने भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा दिल्याचे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी सांगितले.

गुरुवारी (ता. २५) येथील शांतिसागर मंगल कार्यालयात कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाचा मेळावा झाला. यात ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, ऊसतोड कामगाराचा मुलगा राम सातपुते यांच्या रूपाने लोकसभेत निवडून जात आहे. त्यांना समाजाच्या प्रश्नांची जाण आहे.

सोलापूरचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठे सकारात्मक बदल झाले आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व कोळी बांधवांनी भाजप महायुतीचे उमेदवार सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.

यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी, अरुण लोणारी, प्रकाश बोबडे, देवानंद भोईर, सतीश धडे, चंद्रकांत घोडके, शिवशंकर घुले, लक्ष्मण शिरसाट, विक्रम शिरसाट आदी उपस्थित होते. अरुण लोणारी यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद सलगर यांनी सूत्रसंचालन केले. महासंघाचे सचिव सतीश धडे यांनी आभार मानले.

प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार ः राम सातपुते

भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले, कोळी समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आगामी काळात प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. शासनस्तरावर प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. सोलापूरला २५ वर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी कोळी समाज बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीला साथ द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com