esakal | विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मंगळवेढा तालुक्‍याची जम्बो कार्यकारिणी जाहीर !

बोलून बातमी शोधा

BJP Logo

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मंगळवेढा तालुका कार्यकारिणी, विविध आघाड्या व सेलचे प्रमुख, अशी जम्बो कार्यकारिणी तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांनी जाहीर केली आहे. 

विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मंगळवेढा तालुक्‍याची जम्बो कार्यकारिणी जाहीर !
sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी सध्या आमदार प्रशांत परिचारक व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांची नावे अधिक चर्चेत आहेत. तरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्‍यात भाजपने नूतन कार्यकारिणी व 14 जणांना विविध आघाड्या व सेलचे प्रमुख करून जंबो कार्यकारिणी जाहीर करून राजकीय हालचाली गतिमान करण्यास सुरवात केली आहे. 

पंढरपुरात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चौघेजण इच्छुक असल्याचा दावा केला. त्यामध्ये आ. प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे, उद्योजक अभिजित पाटील व प्राचार्य बी. पी. रोंगे यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र आमदार परिचारक की अवताडे? याची उत्सुकता मंगळवेढ्यात शिगेला पोचली असतानाच गट बांधणी करण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान करण्यात आल्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना कमी मते मिळाल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावले असून, निधी हवा असेल तर मताधिक्‍य द्यावे लागेल, अशा सूचना दिल्या. असे असले तरी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या हालचाली गतिमान करण्याच्या दृष्टीने गट बांधणी सुरू केली आहे. 

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मंगळवेढा तालुका कार्यकारिणी, विविध आघाड्या व सेलचे प्रमुख, अशी जम्बो कार्यकारिणी तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांनी जाहीर केली आहे. 

आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, जिल्हा चिटणीस संतोष मोगले, हौसाप्पा शेवडे, सिद्धेश्वर कोकरे, गौडाप्पा बिराजदार, शहराध्यक्ष गोपाळ भगरे यांच्या उपस्थितीत या निवडी करण्यात आल्या. 

जम्बो कार्यकारिणी अशी 
भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी विठ्ठल सरगर (सलगर खुर्द), भटक्‍या विमुक्त सेल तालुकाध्यक्षपदी प्रकाश जाधव (बालाजी नगर), किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी मधुकर चव्हाण (भाळवणी), अनुसूचित जाती - जमाती तालुकाध्यक्षपदी दयानंद कोळी (सिद्धापूर), ओबीसी सेल तालुकाध्यक्षपदी सुधाकर माळी (निंबोणी), अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्षपदी अजित सुलतान पटेल (कात्राळ), व्यापारी आघाडी तालुकाध्यक्षपदी भरत दोशी (अरळी), कायदा सेल तालुकाध्यक्षपदी ऍड. राजू कुलकर्णी (लक्ष्मी दहिवडी), शिक्षक सेल तालुकाध्यक्षपदी सिद्धेश्वर कोरे (नंदूर), उद्योग आघाडी तालुकाध्यक्षपदी हरिभाऊ यादव (मारापूर), कामगार आघाडी तालुकाध्यक्षपदी जयराज चव्हाण (मंगळवेढा), सहकार सेल तालुकाध्यक्षपदी शशिकांत कस्तुरे (जंगलगी), ज्येष्ठ कार्यकर्ता सेल तालुकाध्यक्षपदी दिलीप पुजारी (ब्रह्मपुरी), माजी सैनिक सेल तालुकाअध्यक्षपदी सुखदेव बनसोडे (लक्ष्मी दहिवडी) यांच्या निवडी करण्यात आल्या. 

तर सरचिटणीसपदी दिगंबर भाकरे (आंधळगाव), विश्वास चव्हाण (कचरेवाडी), प्रकाश भिंगे (अरळी), उपाध्यक्षपदी गजानन पाटील (सिद्धापूर), सतीश शिंदे (डिकसळ), श्रीकांत गणपाटील (मरवडे), नागराज कनशेट्टी (हुलजंती), बाळासाहेब यादव (मारापूर), दत्तात्रय बंडगर (नंदेश्वर), सिद्धेश्वर मेटकरी (मानेवाडी), चिटणीसपदी श्रीराम गवळी (भालेवाडी), दत्तात्रय गडदे (उचेठाण), अंकुश डुम (गुंजेगाव), विनोदकुमार बिराजदार (सोड्डी), शरद डोईफोडे (देगाव), सिद्धाराम मल्लाबादी (मारोळी), दिगंबर शिंदे (फटेवाडी), कोषाध्यक्षपदी संजय खर्जे (पडोळकरवाडी), प्रसिद्धिप्रमुखपदी दत्तात्रय आसबे (आसबेवाडी), कार्यालयीन प्रमुख चनबसय्या हिरेमठ (मंगळवेढा) यांची निवड करण्यात आली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल