बोरामणी विमानतळप्रश्‍नी 'चेम्बर'चे शरद पवारांना साकडे!

बोरामणी विमानतळाच्या बाबतीत चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी व मानद सचिव धवल शहा यांनी ही भूमिका मांडली आहे.
बोरामणी विमानतळप्रश्‍नी 'चेम्बर'चे शरद पवारांना साकडे!
sakal
Updated on

सोलापूर : बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ व नान्नज येथील माळढोक अभयारण्याचा इको सेन्सेटीव्ह झोनमधील अंतर मोठे असल्याने हे लक्षात घेऊन विमानतळाचा प्रश्‍न कायमचा सोडवावा यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे. बोरामणी विमानतळाच्या बाबतीत चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी व मानद सचिव धवल शहा यांनी ही भूमिका मांडली आहे.

बोरामणी विमानतळप्रश्‍नी 'चेम्बर'चे शरद पवारांना साकडे!
पूर नियंत्रणासाठी औरंगाबादला मिळणार १४ कोटी

केंद्रीय वन खात्याने सोलापूरांतील गत अनेक वर्षापासुन (सन 2008 पासुन) प्रलंबित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाबाबतची प्रक्रिया मार्गी लावण्याचा निर्णय घेऊन खासबाब म्हणुन 50 कोटी रु. चा निधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी उपलब्ध करुन दिला. या निर्णयाने सोलापूर शहरांत उद्योग, व्यापार वाढीस चालना मिळेल.

सध्या बोरामणी येथील विमानतळासाठी केंद्रीय वनखात्यामार्फत 33 हेक्‍टर जमीन देण्यांस नाकारले आहे. तसेच राज्य सरकार व सर्वोच्च न्यायालयानेही माळढोक इको सेन्सेटीव्ह झोन कमी केले आहे. गेल्या अनेक वर्षापासुन माळढोक हा पक्षी अभयारण्यात आढळुन आलेला नसुन त्याचे कारण सांगत वनविभाग जमीन नाकारत आहे हे जनहिताच्या विरोधात आहे.

बोरामणी विमानतळप्रश्‍नी 'चेम्बर'चे शरद पवारांना साकडे!
कल्याण डोंबिवलीत पुन्हा नाशिक पॅटर्न ?

माळढोक पक्षीचे कारण पुढे करत बोरामणी विमानतळाचे काम थांबविणे अत्यंत चुकीचे आहे. बोरामणी विमानतळची जागा हैद्राबाद रोडलगत असुन माळढोक अभयारण्य (इको सेन्सेटीव्ह झोन) हे बार्शी रोड येथील नान्नज भागात आहे. गेल्या अनेक वर्षापासुन बोरामणी विमानतळासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करुन सुध्दा सदर विमानतळाचे काम पूर्ण होत नाही व अडथळे येत आहेत.

तसेच सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सकडे अनेक व्यापारी, उद्योजक, सलग्न संस्थामार्फेत मागणी होत आहे कि सोलापूरातील नव्याने सुरु होणाऱ्या बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू व्हावे. शासनाकडे पाठपुरावा करावा, विशेष बाब म्हणून व जनहितार्थ व सोलापूरसह राज्यांच्या विकासाकरिता लवकरांत लवकर संबंधित जमीन अधिग्रहण बाबतीत निर्णय घेऊन प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

jewellery theft
Zero Tolerance: Maharashtra IMA Refuses to Support Doctors Implicated in NEET Scam
Sugarcane Farmers Demand Immediate Clearance of ₹130 Crore Pending Bills
Agricultural Department Cracks Down on Seed Racket in Akkalkot
Marathi News Esakal
www.esakal.com