Solapur News : ब्रिटिशांच्या गॅझेटमध्ये सोलापूरची यात्रा, ओम नम: शिवायचा उल्लेख

गड्डा यात्रेवरच १० पाने आणि अन्य उल्लेखही आहेत स्पष्ट
british gazette solapur gadda yatra 10 pages record om namah shivaya chanting record found
british gazette solapur gadda yatra 10 pages record om namah shivaya chanting record foundsakal

रामेश्वर विभूते

Solapur News : ब्रिटिशकालीन इंग्रजी भाषेतील गॅझेटियर ऑफ इंडियामध्ये सोलापूर शहर, जिल्ह्यासह सिद्धरामेश्वरांचे मंदिर, जानेवारी महिन्यात होणाऱ्या यात्रेची माहिती तर आहेच पण त्याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण गॅझेटियरमध्ये ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र शुद्ध मराठीत छापण्यात आला आहे, हे विशेष.

शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा किमान ८०० ते ९०० वर्षांपासून होत आहे. याचा उल्लेख श्री सिद्धरामेश्वरांचे समकालीन संत व कवी राघवांक यांच्या सिद्धरामचरित्रे या ग्रंथातही आहेच. तसेच सोलापूरसह कर्नाटकात मिळालेल्या शिलालेखातही आहेत.

परंतु ब्रिटिशांच्या काळात घेण्यात येणाऱ्या नोंदींमध्येही याचे स्पष्ट उल्लेख असून हब्बू किंवा हिरेहब्बू नामक व्यक्तींकडून सिद्धेश्वराची पूजाअर्चा होते असे संदर्भ या गॅझेटियरमध्ये आहे. मंदिराच्या गर्भगृहातील पूजा हब्बू मंडळी तर नंदीध्वज मिरवणुकीत हिरेहब्बूंचा पहिला नंदीध्वज असेही उल्लेख आहेत.

ही माहिती आहे गॅझेटमध्ये

मूळ १८८४ मध्ये गॅझेटिअर ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र स्टेट गॅझेटिअरची सोलापूर जिल्ह्याबद्दलची माहिती असणाऱ्या पुस्तकाची १९७७ मध्ये दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. यातही मूळ गॅझेटिअर मधील माहिती आहे.

यामध्येही एकूण ११३५ पृष्ठे असून पान क्रमांक ९८६ ते ९९६ अशी दहा पाने सोलापूरच्या यात्रेवर आहेत. यासह भुसार गल्ली परिसरातील पारसनाथ मंदिर हे बारामतीतील जैन मंदिराची प्रतिकृती असून त्याचे निर्माण १८५० मध्ये झाले. त्याकाळी बांधण्यासाठी दीड लाख रुपये लागले. टेंभुर्णीच्या श्री विठ्ठल आणि राम मंदिरासाठी जयपरहून दगड आणले, असे उल्लेख आहेत.

ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. तसेच यात्रेचा उल्लेख असणे हे तर विशेषच. यावरुन शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे कार्य व यात्रेचा इतिहास समोर आला आहे.

- राजेश हब्बू, श्री सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com