

Shocking Crime: Youth Murdered in Vairag After Heated Dispute
Sakal
वैराग : शहरातील दत्तनगर परिसरात डोक्यात दगड घालून ३१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना शनिवारी (ता. २) पहाटेच्या सुमारास घडली. दिनेश ऊर्फ अप्पासाहेब दादासाहेब कापसे (वय ३१) असे मृताचे नाव आहे. मृताचा भाऊ ज्ञानेश्वर कापसे याने दिलेल्या फिर्यादीवरून वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.