

Maharashtra Crime News Cannabis Worth One Crore Found Growing in Sugarcane Field Two Accused Booked by Police
sakal
अक्कलकोट: अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावातील एका शेतकऱ्याच्या उसात तब्बल एक कोटी पाच लाखांचा गांजा आढळला आहे. अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. यात पोलिसांनी शेतकरी मलप्पा गुरबाळप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार, त्यांची मुले सिद्धाराम बिराजदार (वय ३९) आणि श्रीकांत बिराजदार (वय ३०, तिघेही रा. शेगाव, ता. अक्कलकोट) यांना अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.