Solapur : सोलापूर जिल्ह्यातील १ हजार ८४० केंद्रांवर सीसीटीव्ही; जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग पाहणार केंद्रांवरील हालचाली

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यंदा सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील एकूण तीन हजार ६१८ मतदान केंद्रांपैकी एक हजार ८४० केंद्रांवर सीसीटीव्ही (वेब- कास्टिंग) बसविले जाणार आहेत.
CCTV at 1 thousand 840 centres in Solapur district Collector Election Commission watch on voting center
CCTV at 1 thousand 840 centres in Solapur district Collector Election Commission watch on voting centerSakal

सोलापूर : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यंदा सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील एकूण तीन हजार ६१८ मतदान केंद्रांपैकी एक हजार ८४० केंद्रांवर सीसीटीव्ही (वेब- कास्टिंग) बसविले जाणार आहेत.

या प्रत्येक केंद्रांवरील हालचाल जिल्हाधिकाऱ्यांसह थेट निवडणूक आयोगालाही त्याहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास जिल्हा प्रशासनाची पंचाईत होणार आहे. सोलापूरपेक्षाही माढा लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक अर्ज येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.

पण, सकल मराठा समाजाने निवडणूक काळात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना त्यांचे सोशल मिडिया अकाउंट चालविणाऱ्यांची नावे द्यावी लागणार आहेत.

त्याशिवाय कोणी परस्पर प्रचार करीत असल्यास त्याच्यावर कडक कारवाई होवू शकते, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे. सोशल मिडिया वापरणाऱ्यांनी आपल्याकडून कोणाची बदनामी होणार नाही,

दोन गटात, धर्म किंवा जातीत तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. सोशल मिडियातून अपप्रचार केल्यास किंवा आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितांवर माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय दंड विधान कायद्याअंतर्गत ठोस कारवाई होणार आहे.

आचारसंहितेचा भंग केल्यास गुन्हा

कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराने, नेत्याने, पदाधिकाऱ्याने आचारसंहितेचा भंग केल्यास त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम १८८ नुसार पोलिसांत गुन्हा दाखल होतो. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी देखील त्यासंदर्भातील गुन्हा थेट दाखल करणार आहेत.

आचारसंहितेचे एकदा उल्लंघन केल्यास नोटीस बजावली जाईल, पण त्यानंतरही आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मतदानाला जाताना यापैकी एक ओळखपत्र आवश्यक

  • फोटो असलेले मतदान ओळखपत्र

  • आधारकार्ड, मनरेगा कार्ड

  • बॅंक किंवा पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबूक

  • आरोग्य विमा कार्ड किंवा पॅनकार्ड

  • भारतीय पासपोर्ट, वाहनचालक परवाना

  • सामाजिक न्याय विभागाने दिव्यांगांना दिलेले ओळखपत्र

  • नोंदणी महानिबंधकांतर्फे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत मिळालेले स्मार्ट कार्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com