
वैराग : वैराग भागातील शेतातून दोन दिवसांपूर्वी दोन ट्रॅक्टर चोरीस गेल्याची तक्रार वैराग पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी युद्धपातळीवर डीबी पथक नेमून तपास करून अवघ्या ४८ तासांत दोन चोरट्यांना जेरबंद केले. चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर आणि रोटावेटर सह सहा लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.