

Central officials in Solapur capturing flood and rain damage during inspection visit.
Sakal
सोलापूर : सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी, सीना नदीला आलेला महापूर याच्या आठवणी अजून ताज्या आहेत. नदीकाठच्या भागात महापुरात वाहून आलेले चगळ पुराची तीव्रता किती होती, याची साक्ष आजही देत आहे. केंद्रीय पथकाने आज उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या पूरग्रस्त गावांना भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसान एवढ्या मोठ्या प्रमाणावर होते की, अधिकाऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ही दाहकता टिपली आहे.