

Central Railway Speeds Up Restoration After Landslides; First Track Now Operational
sakal
सोलापूर : लोणावळा-कर्जत घाटात दरड कोसळल्यानंतर विस्कळित झालेली रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. मंगळवारी (ता. ७) रात्री १०.३० वाजता एक रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून उर्वरित दोन मार्गांवरील दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे.