
सोलापूर : डोणगाव ते भोजप्पा तांडा रोडवरून सलगरवाडीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी एका महिलेला सेटलमेंटकडे जाणारा रस्ता कोणता? असे विचारले. इंदूबाई तानाजी कांबळे (वय ५५, रा. विष्णू मिल चाळ, डोणगाव रोड) यांनी त्या दुचाकीस्वारांना रस्ता सांगितला. पण, दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने इंदूबाई यांच्या गळ्यात हात घालून एक तोळ्याचे गंठण हिसकावून नेले. याप्रकरणी सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.