
पंढरपूर : चैत्री यात्रेचा सोहळा उद्या मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे. यात्रेच्या निमित्ताने मंदिर समितीने श्री विठ्ठल भक्तांसाठी जवळपास सहा लाख बुंदीलाडू प्रसाद उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. यावर्षी चैत्री यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येतील, असा अंदाज आहे. येणाऱ्या भाविकांना लाडू प्रसाद मिळावा, यासाठी बुंदीलाडू प्रसाद आणि राजगिरा लाडू तयार करण्यात आले आहेत.