
Chandrabhaga river at warning level after Ujani dam releases heavy discharge; flood threat persists in Solapur.
Sakal
पंढरपूर: भीमा आणि नीरा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून सोमवारी दुपारपासून भीमानदी पात्रात तब्बल एक लाख १५ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान सोमवारी रात्री पंढरपुरात चंद्रभागा इशारा पातळीवरून वाहू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केले आहे.