

“No Need to Approach Praniti Shinde,” Says Chandrakant Khaire in Interaction with ‘Sakal’
Sakal
सोलापूर : प्रणिती शिंदे यांना आमच्या लोकांनी लोकसभेला खूप मदत केली. पण त्यांनी विधानसभेला त्याची जाणीव ठेवली नाही. निवडून आल्यानंतर त्या मातोश्रीवरसुद्धा गेल्या नाहीत. आपल्या साहेबांचाच जर मान सन्मान ठेवत नसतील तर कसे सहन करणार? सोलापुरातील आमच्याच पक्षाचे काही नेते परस्पर जाऊन काँग्रेसवाल्यांशी बोलतात. तसे करू नका. प्रणिती शिंदे यांच्या दारात जाऊच नका. कोणी गेलेच तर पक्षातून काढून टाकेन, असा रोखठोक इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघटक आणि उपनेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.