Sharad Pawar News : पवार मुख्यमंत्री असताना मराठ्यांचा ओबीसीत समावेश का केला नाही? चंद्रकांत पाटलांचा सवाल

Lok Sabha Election 2024 : शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिलं असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
Chandrakant Patil On Sharad Pawar Solapur Lok sabha election marathi reservation politics news
Chandrakant Patil On Sharad Pawar Solapur Lok sabha election marathi reservation politics news

मोहोळ : समाजातील जे घटक भाजपा विरोधी आहेत त्यांच्या घरा पर्यंत जाऊन पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यासाठी काय केले आहे हे त्यांना समजावून सांगितले पाहिजे, तरच त्यांचा गैरसमज निघणार आहे.

ओबीसी ना 1992 साली आरक्षण मिळाले, त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. आरक्षणाच्या यादीत मराठा समाजाला का घातले नाही? मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण आरक्षणाबाबत एकाने ही प्रयत्न केला नाही, शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिले. भाजपा घटना बदलणार असा अपप्रचार केला जात आहे, परंतु घटना बदलता येत आहे त्यात वेळोवेळी प्रसंगा नुसार दुरुस्ती करता येते. देशाच्या भवितव्यासाठी सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना निवडून द्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

लोकसभेचे उमेदवार आमदार सातपुते यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे पेनुर ता मोहोळ येथे आयोजन केले होते त्यावेळी पालकमंत्री पाटील मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे होते. पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, मराठ्यांना ओबीसी म्हणण्या पूर्वीच त्यांच्या विद्यार्थ्यांची कोट्यावधीची फी शासनाने भरली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधित पाच ठिकाणे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. त्याला निधीही उपलब्ध झाला आहे. मुस्लिम समाजाचा गैरसमज काढला पाहिजे. पंतप्रधानांनी गॅस व धान्य मोफत दिले आहे, आजारावरील उपचारासाठी पाच लाखाची सुविधा ही मोफत दिली आहे. येत्या एक जून पासून आता मुलींना शिक्षण ही मोफत दिले जाणार आहे. 22 पक्ष एकत्र आले आहेत त्यामुळे आमदार सातपुते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.

Chandrakant Patil On Sharad Pawar Solapur Lok sabha election marathi reservation politics news
RTE Admission : राज्यात आरटीईसाठी सर्वाधिक अर्ज पुण्यातून; राज्यात थंड प्रतिसाद

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे म्हणाले, महायुतीच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. पेनुर सारख्या गावाला आज पर्यंत कधीच मिळाला नाही एवढा निधी उपलब्ध झाला आहे. आणखी विकासासाठी आमदार सातपुते यांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अर्चना बचुटे, समाधान माने, राष्ट्रवादीचे रामदास चवरे, हरिश्चंद्र चवरे, भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुशील क्षीरसागर,मुजीब मुजावर, सागर चवरे आदीसह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन श्री रणदिवे यांनी करून रमेश माने यांनी आभार मानले.

Chandrakant Patil On Sharad Pawar Solapur Lok sabha election marathi reservation politics news
Rahul Vaidya : दुबईच्या पुरात अडकला मराठी गायक, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हणाला....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com