Solapur News : देशातील महत्त्वपूर्ण कामे मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात अतिशय महत्त्वपूर्ण कामे झालेली आहेत.
chandrakant patil over pm narendra modi leadership work profile
chandrakant patil over pm narendra modi leadership work profile Sakal

नातेपुते : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात अतिशय महत्त्वपूर्ण कामे झालेली आहेत. त्यामध्ये महिलांसाठी शौचालय, गॅस, मोफत रेशन, पाच लाखांपर्यंत मोफत औषधोपचार आणि प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी,

महिलांना बसमध्ये पन्नास टक्के सवलत, मुलींना शालेय फी माफ इत्यादी कामे केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत फक्त आणि फक्त मोदींसाठी प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्ष व सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी मनसेचे अप्पासाहेब कर्चे, शिवसेना शिंदे गटाचे सतीश सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुरेश पालवे,

अक्षय भांड, रमेश पाटील, के. के. पाटील इत्यादींनी मार्गदर्शन केले. पाटील म्हणाले, जगात सर्वात मोठा देश भारत असून लोकशाही मानणारा हा देश आहे. आपणास अनेक क्रांतिकारक निर्णय घेण्यासाठी भक्कम सरकारची गरज आहे.

गेल्या दहा वर्षात देशात एकही दंगल, बॉम्बस्फोट झाला का? प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. ही लढत मोहिते पाटील विरुद्ध नाईक निंबाळकर अशी नसून ही देशाच्या अस्मितेची लढत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे त्रिदेव प्रत्येकाचा हिशेब घेण्यास खंबीर आहेत.

ते कुणाचा हिशेब शिल्लक ठेवणार नाहीत. यावेळी अप्पासाहेब कर्चे यांनी जोरदार भाषण करून वास्तव सर्वांसमोर मांडले. बाळासाहेब सरगर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मंचावर सोपानराव नारनवर, भानुदास राऊत, राजकुमार पाटील, सुरेश पालवे,

बाजीराव काटकर, जयकुमार शिंदे, हणमंत सुळ, हनुमंतराव ढालपे, विजयकुमार उराडे, दादासाहेब उराडे, रमेश पाटील, प्रवीण काळे, देविदास चांगण, राहुल पद्मन, गणेश पागे, सुधीर काळे, संजय देशमुख, शशी कल्याणी, मित्र पक्षांचे पदाधिकारी, ग्रामीण भागातील कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

मोहिते-पाटील स्वतःच्या स्थिरतेसाठी भाजपमध्ये आले

के के पाटील म्हणाले, दोन-दोन पिढ्या संघर्ष केला आहे. मार खाल्ला आहे. शेतीवर बोजा चढवलेला आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी मोहिते पाटील भाजपमध्ये गेलेले नव्हते. तर ते स्वतःला स्थिर करण्यासाठी गेले होते. तुमच्या अडचणी सोडवायला तुम्ही आला होता. तुम्हाला आमदार केले, बंद पडलेला सदाशिवनगर साखर कारखाना सुरू करून दिला. तरीही तुम्ही फसवणूक केली आहे. पण लोक आता जागृत झाले आहेत. त्यामुळे कोणाला गृहीत धरू नका, असा सल्लाही त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com