सोलापूर-हसन रद्द तर एलटीटी-कोईमतूर एक्‍स्प्रेसच्या मार्गात बदल

सोलापूर-हसन रद्द तर एलटीटी-कोईमतूर एक्‍स्प्रेसच्या मार्गात बदल
LTT Express
LTT Expressesakal
Summary

बंगळूर विभागातील यलहंका आणि पनुकोन्डा स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगच्या कामाकरिता सोलापूर स्थानकावरून धावणारी सोलापूर-हसन एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

सोलापूर : दक्षिण-पश्‍चिम रेल्वेमधील (South-Western Railway) बंगळूर (Bangalore) विभागातील यलहंका आणि पनुकोन्डा स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगच्या कामाकरिता (दुहेरीकरणाकरिता) सोलापूर स्थानकावरून (Solapur Railway Station) धावणारी सोलापूर-हसन एक्‍स्प्रेस (Solapur-Hassan Express) रद्द करण्यात आली आहे, तर लोकमान्य टिळक टर्मिनस- कोईमतूर एक्‍स्प्रेसच्या (Lokmanya Tilak Terminus - Coimbatore Express) मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे (Railway) प्रशासनाकडून देण्यात आली.

LTT Express
यळकोट यळकोट जय मल्हार! बाळे येथील खंडोबा यात्रेस प्रारंभ

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

यात्रा प्रारंभ 12 ते 14 डिसेंबर दरम्यान गाडी क्रमांक 11311 सोलापूर- हसन विशेष एक्‍स्प्रेस तर यात्रा प्रारंभ 13 ते 15 डिसेंबर दरम्यान गाडी क्रमांक 11312 हसन- सोलापूर विशेष एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

मार्गात परिवर्तन करण्यात आलेल्या गाड्या

यात्रा प्रारंभ 12 आणि 13 डिसेंबर रोजी गाडी क्रमांक 01013 लोकमान्य टिळक टर्मिनस- कोईमतूर विशेष एक्‍स्प्रेस ही गुंटकल, कडप्पा, रेनिगुंटा, जोलारपेठा आणि सेलम मार्गे धावेल. ही गाडी वरील तारखेला अनंतपूर, धर्मावरम, साईप्रशांत निलायम, हिंदुपूर, गौरीबिदनूर, बंगळूर पूर्व, बंगळूर कैंट, बंगळूर, होसूर आणि धर्मपुरी स्थानकाला जाणार नाही.

LTT Express
जळगाव मनपातील 27 बंडखोर नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस

यात्रा प्रारंभ 13 ते 14 डिसेंबर रोजी गाडी क्रमांक 01014 कोईमतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्‍स्प्रेस ही सेलम, जोलारपेठा, रेनिंगुटा, कडप्पा आणि गुंटकल मार्गे धावेल. ही गाडी वरील तारखेला धर्मपुरी, होसूर, बंगळूर, बंगळूर कैंट, बंगळूर पूर्व, गौरीबिदनूर, हिंदुपूर साईप्रशांत निलायम, धर्मरम आणि अनंतपूर स्थानकाला जाणार नाही.

तरी सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com