esakal | क्‍युआर कोड वापरून एका व्यक्तीची फसवणूक | Solpaur
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud Case

क्‍युआर कोड वापरून एका व्यक्तीची फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील एका जणास ओएलएएक्‍सवर जुने फर्निचर खरेदी करण्याच्या नावाखाली क्‍युआर कोड पाठवून एका जणाच्या खात्यामधून 1 लाख 92 हजार 500 रुपयांची रक्कम काढून घेतल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार सुशांत विरेंद्र गांधी (रा. बुधवार पेठ) यांनी ओएलएक्‍स या ऑनलाईन स्थळावर त्यांचे जुने फर्निचर विकण्याबाबतची जाहीरात टाकली होती. तेव्हा ही जाहीरात पाहून एका व्यक्तीने मो. 9336738092 वरून त्यांना कॉल करून फर्निचर खरेदी करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर या मोबाईल धारकाने एक क्‍युआर कोड व्हॉटसऍपवर सेंड करून त्यावर पैसे टाका. तुमचे पैसे परत येतील असे सांगत त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर श्री.गांधी यांनी पाठवलेल्या क्‍यूआर कोडचा गैरफायदा घेऊन श्री. गांधी यांच्या बॅंक खात्यावरून 1 लाख 92 हजार 500 रुपयाची रक्कम काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर श्री. गांधी यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हयाचा तपास पोलिस कर्मचारी श्री. पोळ करीत आहेत.

loading image
go to top