Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून प्रशासन व ग्रामस्थांमध्ये तणावाचे वातावरण

शेटफळ (ता. करमाळा) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला आहे.
Police Bandobast
Police BandobastSakal

करमाळा - शेटफळ (ता. करमाळा) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला आहे. हा पुतळा अनाधिकृत असून पुतळा उभा करण्यासाठी शासनाची परवानगी घेतली नसल्याने हा पुतळा हटवण्यात यावा असा आदेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

शेटफळ (ना.) येथे अर्ध पुतळा गेली वीस वर्षांपासून उभा होता. मात्र काही कारणास्तव हा पुतळा खराब झाल्यामुळे तेथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन सर्व समाजाला बरोबर घेऊन अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. मात्र परवानगीशिवाय हा पतळा उभारला असल्याने पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन गावकऱ्यांना हा पुतळा काढण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत प्रांतधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार विजयकुमार जाधव, व पोलिस प्रशासन यांनी ता.24 रोजी सकाळी 11 वाजता भेट देऊन पुतळा काढण्यासंदर्भात सरपंच व ग्रामस्थांना सुचना केल्या.

यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पविञा घेत पुतळा काढण्यास विरोधात केला. मात्र प्रशासन त्यांच्या भूमिकेवरती ठाम असून ग्रामस्थ पुतळा हटू देणार नाही या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यामुळे शेटफळ ता करमाळा येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पोलीस संरक्षण ठेवण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास आमचा विरोध नाही. मात्र हा पुतळा बसवण्यासाठीच्या प्रशासकीय बाबीची पूर्तता करावी अशी भूमिका प्रशासनाची आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेली वीस वर्षापासून आमच्या गावात आहे. त्यामुळे हा पुतळा आम्ही हटवणार नाही. अशी भूमिका ग्रामस्थांची आहे त्यामुळे ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागोबाचे शेटफळ येथील मंदिर संस्थांच्या जागेत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गेली वीस वर्षापासून पुतळा आहे. त्यामुळे यापूर्वी शासनाने कुठल्याही प्रकारचे विचारणा केली नाही आणि आत्ता शासनाने याबाबत पत्रव्यवहार सुरू केला असून, पुतळा काढण्याबाबत आदेश दिले आहेत याविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक पवित्र्यात आहेत.

गेली वीस वर्षांपासून या जागी पुतळा होता त्याच जागी युवकांनी पुतळा उभा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत गावातील कोणाचीही तक्रार नाही असे असताना प्रशासन करत असलेली कारवाई गावकऱ्यांना मान्य नाही, भावनेचा विचार करून प्रशासनाने तोडगा काढावा.

- विकास संदिपान गुंड, सरपंच, शेटफळ, ता. करमाळा, जि. सोलापूर

याबाबत काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर वस्तुस्थितीचा मेल केलेला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून योग्य ते सूचना प्रशासनाला येऊन सर्व शिवभक्तांच्या भावनेचा आदर करून प्रशासनाने पुतळा काढण्याची भूमिका बदलावी.

- महेश चिवटे, जिल्हाप्रमुख शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com