Chief Minister Avatade Ganapat darshan of Ganesha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

samadhan avtade

SOLAPUR : मुख्यमंत्र्याचा गणपती आ.अवताडे यांना पावणार का ?

मंगळवेढा : राज्यात मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाला तरुणाईचा जल्लोष वाढत असताना मुख्यमंत्री आणि त्यांच्या गणेश दर्शनाची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.अशा परिस्थितीत पंढरपूरचे आ.समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानातील गणपतीचे दर्शन घेऊन मतदार संघातील प्रश्न मार्गी लागण्याबाबत साकडे घातले त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील गणपती आ. अवताडे यांना पावणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

राष्ट्रवादीच्या जागेवरून झालेल्या पोटनिवडणुकीत आ.समाधान आवताडे विजयी झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात 105 चे 106 झाले तरी विरोधातच अशी टर विरोधकाडून उडवली गेली मात्र दोन महिन्यापूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यामुळे स्थानिक आमदार राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे एकाच पक्षाचे झाल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती मानले जाणारे आ.अवताडे यांच्या मतदारसंघातील प्रश्न सुटण्याची अशा निर्माण झाली.

अशा परिस्थितीत आ. समाधान आवताडे यांनी तालुक्यातील रस्त्याच्या प्रश्नावर कोट्यावधी रुपये निधी प्राप्त केला. शिवाय आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणी मागणी केलेल्या आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी,चोखामेळानगर,दामाजीनगर या चार गावासाठी 28 कोटी 98 लाखाची तरतूद नुकतीच करून घेतली . नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी 31 पेक्षा अधिक प्रश्नांची लक्षवेधी उपस्थित केले मात्र बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेवर त्यांना बोलण्याची संधी मिळाली त्यामध्ये त्यानी दुष्काळात जन्मलो तरी दुष्काळात मारू नका असे भावनिक आवाहन केले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपताच सात दिवसात या योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही व तिथून सात दिवसात कॅबिनेटचे मंजुरी देण्याचे आश्वासन दिले होते .

त्यामुळे या योजनेच्या संदर्भातील मुख्यमंत्र्यांच्या सहीकडे असल्याने मतदारसंघाचे लक्ष लागले असतानाच आ.समाधान आवताडे यांनी हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मुंबई ठाण मांडले आहे गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक धार्मिक सणावर गंडांतर आले यंदा जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे सर्व धार्मिक सण खुल्या व उत्साही वातावरणात साजरे करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे यंदा गणेशोत्सव धामधुमीत सुरू झाला आहे अशा परिस्थितीत आज आ. आवताडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानातील गणपतीचे दर्शन घेवून यांच्याबरोबर मतदारसंघातील विविध समस्यांबद्दल सविस्तर चर्चा केली.आ.रविंद्र फाटक यांनी आ.आवताडे सत्कार केला. त्यामुळे मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न बाबत मुख्यमंत्र्यांचा गणपती पावणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Web Title: Chief Minister Avatade Ganapat Darshan Of Ganesha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..