esakal | मुख्यमंत्र्यांच्या कौतुकामुळे भारावले आराध्याचे कुटुंबीय 

बोलून बातमी शोधा

kadu familly

वाढदिवसाची अविस्मरणीय भेट 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आराध्याची दखल घेऊन तिचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी केलेले कौतुक म्हणजे आराध्यासाठी वाढदिवसाची अविस्मरणीय भेट आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या कौतुकाबद्दल आम्ही सर्व कडू कुटुंबीय अतिशय आभारी आहोत. 
- अजय कडू, आराध्याचे वडील तथा झोनल मॅनेजर, बॅंक ऑफ इंडिया 

मुख्यमंत्र्यांच्या कौतुकामुळे भारावले आराध्याचे कुटुंबीय 
sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : संपूर्ण जग, देश आणि महाराष्ट्र कोरोनाच्या संसर्गाच्या विरोधात सध्या लढत आहे. कोरोनासोबत लढणाऱ्या महाराष्ट्रात आज काय घडले? याची माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकण्यासाठी महाराष्ट्र आतुरलेला असतो. आजच्या संवादाला सुरवात करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापुरातील आराध्या कडू या मुलीचा आवर्जून उल्लेख केला. कोण आराध्या? हा प्रश्‍न सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला काही पडला होता. बॅंक ऑफ इंडियाच्या सोलापूर झोनचे झोनल मॅनेजर अजय कडू यांची कन्या आराध्या असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे कडू कुटुंबीय भारावून गेले आहे. 
हेही वाचा - शरद पवारांनी आपल्या विश्‍वासूला सोलापुरात का आणले? 
श्री. कडू हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे आहेत. नोकरी निमित्त ते सध्या सोलापुरात आहेत. आराध्याने वाढदिवस साजरा न करता ते पैसे मुख्यमंत्री सहायता निधी आणि पीएम केअर्स निधीला दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मिडियाद्वारे आज जनतेशी संवाद साधताना आराध्याचे कौतुक केले आहे. आराध्या अजय कडू हिने वाढदिवसासाठी खर्च करण्यात येणारे 10 हजार रुपये कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी दिले आहेत. तिच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कौतुक केले. 
हेही वाचा - साखर कारखानदारांचे यश : सोलापूरचे सॅनिटायजर जाणार इतर राज्यात 
आराध्याचा सातवा वाढदिवस काल (शुक्रवारी, ता. 3) होता. वाढदिवस साजरा न करता हे पैसे आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला द्यायचे का? असे आराध्याचे वडील अजय कडू व आराध्याची आई सोनल कडू यांनी आराध्या आणि मुलगा आर्यन यांना विचारले. यावर त्या दोघांनीही पैसे द्या, असे लगेच सांगितले. त्यानुसार श्री. कडू यांनी काल पाच हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस आणि पाच हजार पीएम केअर्स फंडासासाठी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले. आराध्या ही पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीत शिकते. बोलक्‍या स्वभावाची आराध्या स्केटिंग उत्तम करते.