esakal | हाताला काम नाही अन्‌ कोरोनामुळे जीणे झाले मुश्‍किल! पालकांना वयात आलेल्या मुलींची चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

Child marriage

अशा संकटातू वाट काढताना पालकांनी मजबूर होऊन मुलींचा स्वस्तात बालविवाह करण्याचा पर्याय निवडल्याचे चित्र संबंध महाराष्ट्रात पहायला मिळत आहे.

हाताला काम नाही अन्‌ कोरोनामुळे जीणे झाले मुश्‍किल

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाची (Corona) महामारी, डोक्‍यावर पूर्वीच्या कर्जाचा डोंगर, कडक निर्बंधांमुळे जगायला पैसे नाहीत, घरात वयात आलेली मुलगी, शाळा बंद अन्‌ तिच्या भविष्याची चिंता, शासनाकडून मुलींसाठी दमडीचीही मदत नाही, अशा संकटातू वाट काढताना पालकांनी मजबूर होऊन मुलींचा स्वस्तात बालविवाह (child marriage) करण्याचा पर्याय निवडल्याचे चित्र संबंध महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. हुंडा नाही अन्‌ कमी लोकांमध्ये स्वस्तात विवाह होतोय म्हणून उरकले जाणारे तब्बल 79 बालविवाह (child marriage) एप्रिल 2020 ते 31 मे 3021 या काळात जिल्हाभरात पोलिसांच्या मदतीने बालकल्याण अधिकाऱ्यांनी रोखले आहेत. (the rate of child marriage has increased in the corona crisis)

हेही वाचा: मोडकळीस आलेले होमगार्ड कार्यालयाचे 35 वर्षानंतर पालटले रुप

गावात एकाही अल्पवयीन मुलीचा विवाह होऊ नयेत म्हणून ग्रामसेवकाला बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून अधिकार देण्यात आले आहेत. तर महिला, मुला-मुलींच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा महिला बालकल्याण विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ कार्यरत आहेत. तरीही, बालमजुरी, बालविवाहाचे प्रमाण कमी झालेले नाही. दुसरीकडे विविध गुन्ह्यांमध्ये बालकांचा समावेश असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

हेही वाचा: सोलापूर : 24 तासात कोरोनाचे 479 नवीन रुग्ण; तर सहा जणांना म्युकरमायकोसिस

कोरोना काळात शाळा बंद असल्याने गावोगावी सर्रास बालविवाह होऊ लागले आहेत. ज्या विवाहाची माहिती मिळाली, त्याचठिकाणी कारवाई केली जाते. मात्र, गुपचूपही मोठ्या प्रमाणावर याकाळात बालविवाह पार पडले आहेत. नुकतीच वयात आलेल्या मुलीचा कमी वयात विवाह लावून दिल्यानंतर तिच्या शारीरिक प्रकृतीत बिघाड, तिची मानसिकता, घरातील संघर्ष आणि शेवटी घटस्फोट, असे प्रकारही अनुभवायला मिळत असल्याचे जिल्हा बाल संरक्षण कक्षातील विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: राज्यात एकही बालविवाह होऊ देणार नाही; या मंत्र्याने केले साथ देण्याचे आवाहन

बालविवाहाची समोर आलेली कारणे...

- रोजगारानिमित्त स्थलांतर वाढले; वयात आलेल्या मुलींबद्दल पालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना

- मुलीला पालक नाहीत अथवा वडिल व्यसनी असल्याने आई माहेरी राहते

- शाळा बंद असल्याने पालकांना वयात आलेल्या मुलींची चिंता

- निर्बंधामुळे स्वस्तात होतोय विवाह; हुंडा न देता मुलीच्या विवाहाचा खर्चही कमी

- पालकांचे हातावरील पोट आणि सध्या हाताला काम नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता

हेही वाचा: जिल्ह्यातील 74 बालविवाह रोखले ! कोरोना काळात का वाढले बालविवाह?

घरोघरी सर्व्हे झाल्यास आकडेवारी येईल समोर

सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षभरात (मार्च 2020 ते 31 मे 2021) जवळपास 79 बालविवाह रोखले आहेत. दुसरीकडे पालकांनी कोणालाही खबर न देता गुपचूप मोठ्या प्रमाणावर लहान वयातील (18 वर्षांपेक्षा कमी) मुलींचे विवाह उरकले आहेत. बालकल्याण समितीने रोखलेल्या बालविवाहाची आकडेवारी स्पष्ट आहे. मात्र, गावोगावी संबंधित शाळांमधील शिक्षकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हे केल्यास गुपचूप विवाह उरकलेल्या मुलींची आकडेवारी समोर येईल, असा विश्‍वास तज्ज्ञांनी व्यक्‍त केला आहे. बालविवाह होऊनही त्या मुलींचे नावे शाळांच्या पटावर आहेत, हे आश्‍चर्यच. (the rate of child marriage has increased in the corona crisis)

loading image