
Heavy rains hit flower supply; Pandharpur sees record chrysanthemum and marigold prices.
Sakal
-राजकुमार घाडगे
पंढरपूर : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर येथील फूल बाजारामध्ये मंगळवारी (ता. ३०) झालेल्या लिलावामध्ये शेवंतीच्या फुलाच्या एका कॅरेटला प्रतवारीनुसार दीड ते दोन हजार रुपये तर झेंडू फुलाच्या एका कॅरेटला ४५० ते ५०० असा उच्चांकी दर मिळाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे फुलशेतीचे अतोनात नुकसान झाल्याने यंदा फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. फुलांची आवक कमी झाल्याने लिलावामध्ये फुलहार विक्रेते चढाओढीने फुले खरेदी करत आहेत. त्यामुळे यंदा दसरा सणाच्या दरम्यान सर्वच फुलांचे दर चढेच राहणार असल्याची माहिती फुलांचे आडत व्यापारी यमाजी देवमारे यांनी दिली.