Solapur News : हरभऱ्यावरील घाटेअळीने ओलांडली नुकसानीची पातळी

कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी; हरभऱ्याच्या एका झाडावर चार ते पाच घाटेअळ्यांचा प्रादुर्भाव
cicers crop ghate ali damage crop agriculture department officials farmers solapur
cicers crop ghate ali damage crop agriculture department officials farmers solapurSakal

रोपळे बुद्रूक : हरभरा पिकावरील घाटेअळीचे रीडिंग घेण्यासाठी नुकतीच कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले. तेव्हा त्यांना घाटेअळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओळांडल्याचे काही ठिकाणी दिसून आले. ता. १० रोजी सकाळमध्ये हरभरा पिकावर घाटेअळीचा हल्लाबोल या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली.

या बातमीची दखल घेऊन पंढरपूर तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे व त्यांच्या टीमने तालुक्यातील हरभऱ्याच्या काही प्लॉटची पाहणी केली. तेव्हा त्यांना काही ठिकणी हरभऱ्यावर घाटेअळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. रोपळे (ता. पंढरपूर) येथील संजय बिस्किटे यांच्या हरभरा पिकातील एका-एका झाडावर पाच ते सहा घाटेअळ्या दिसून आल्या. श्री. बिस्किटे यांच्या हरभरा पिकात पक्षी थांबे उभा करण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला. तेव्हा कृषी विभागाच्या टीमलाही हरभऱ्याच्या पिकात ज्वारीची ताटे पक्ष्यांना बसण्यासाठी असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

हरभऱ्याच्या एका प्लॉटमध्ये तर या टीमने हरभऱ्यावर घाटे आळी नसून ती मकेवरील लष्करी आळी असल्याचाच सूर आळवला. तेव्हा त्यांना हरभऱ्याच्या पानांच्या कडा वाळल्याचे घाटेअळी आल्याचे प्राथमिक लक्षण दाखवून देण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, तुंगत मंडळ कृषी अधिकारी सुमीत येलमार, कृषी सहाय्यक गणेश जाधव, कृषी सहाय्यक सागर भोसले, कृषी सहाय्यक शिवाजी चव्हाण, विलास भोसले, पंचायत समितीचे माजी सदस्य महेश कदम यांच्यासह शेतकरी संजय बिस्किटे, पांडुरंग व्यवहारे, वसंत आदमिले आदी शेतकरी उपस्थित होते.

कृषी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज

कृषी कर्मचाऱ्यांना घाटेअळी व लष्करी अळी यातील फरक प्रथम लक्षात आला नाही. घाटेअळीच्या अवस्थेनुसार तिचा रंग बदलत असल्यामुळे त्यांना लवकर घाटेअळीचे निदान झाले नाही. उपस्थित शेतकऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली नसती तर कदाचित हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झालाच नाही, असाच रिपोर्ट गेला असता. त्यामुळे कृषी कर्मचाऱ्यांना आता पिकावरील कीड ओळखीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

काही ठिकाणी हरभऱ्यावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव कमी आहे. तर काही ठिकाणी हरभऱ्यावरील घाटेअळीने नुकसानीची पातळी ओलांडली आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क करावा. त्यांना आम्ही पन्नास टक्के अनुदानावर इमामेक्टीन बेन्झॉइट ५ टक्के ईसी हे कीटकनाशक फवारणीसाठी देणार आहोत.

- सूर्यकांत मोरे, तालुका कृषी अधिकारी, पंढरपूर

आमच्या शेतातील हरभऱ्याचा प्लॉट कृषी अधिकाऱ्यांनी पाहिला. तेव्हा त्यांना हरभऱ्याच्या एका -एका झाडावर चार ते पाच घाटेअळ्या दिसून आल्या.

- संजय बिस्किटे, हरभरा उत्पादक शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता.पंढरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com