esakal | आम्हाला गावातच "टुचुक' करावे ! वयोवृद्ध चोपडीकरांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

लसीकरणाच्या नव्या मोहिमेमध्ये शासनाने विविध प्रकारचे बदल केले आहेत. त्यानुसार उपकेंद्राच्या अंतर्गत असणाऱ्या गावातील लोकांना उपकेंद्रात लस घेण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत.

आम्हाला गावातच "टुचुक' करावे ! वयोवृद्ध चोपडीकरांची मागणी

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : कोरोना (Corona) लसीकरणाच्या (Covid-19 Vaccination) नव्या मोहिमेमध्ये शासनाने विविध प्रकारचे बदल केले आहेत. त्यानुसार उपकेंद्राच्या अंतर्गत असणाऱ्या गावातील लोकांना उपकेंद्रात लस घेण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या गावातील लोकांकडून गावातच लसीकरण व्हावे अशी मागणी जोर धरत आहे. चोपडी (ता. सांगोला) (Snagola Taluka) गावातील वयोवृद्धांकडून "आम्हाला गावातच टुचुक (लसीकरण) करावे' अशी मागणी केली जात आहे. (Citizens of Chopadi have demanded that corona be vaccinated in the village itself)

हेही वाचा: कोरोनाबाधित मित्राच्या पत्नीवर पोलिस मित्राचा अत्याचार ! "तो' पोलिस निलंबित

चोपडी हे गाव बलवडी या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत येते. चोपडी गावची लोकसंख्या पाच हजार 366 आहे. बलवडी गावची लोकसंख्या तीन हजार 388 तर बंडगरवाडीची 537 आहे. या गावांचे एकत्रित लसीकरण बलवडी येथील उपकेंद्रावर होणार आहे. वयानुसार तिन्ही गावांची यादी एकत्रित बनवलेली आहे. ती यादी गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयापुढे लावण्यात येणार आहे. रोज जेवढ्या लसी उपलब्ध होतील त्यानुसार या तिन्ही गावात लावलेल्या यादीतील क्रमांकानुसार लोकांना लसीकरणासाठी बोलावण्यात येणार आहे. कोणत्या क्रमांकापासून लसीकरण सुरू आहे किंवा ते कोणत्या क्रमांकापर्यंत आले आहे, या गोष्टीची माहिती गावातील वयोवृद्ध लोकांना मिळणे थोडेसे अवघड होणार आहे. काही दिवस या लोकांना माहिती मिळेल परंतु त्यानंतर माहिती मिळणे अवघड होईल. त्याचबरोबर वयोवृद्ध लोकांना बलवडी येथे जाऊन लसीकरण करणे अवघड होणार आहे. आरोग्य विभागाने लावलेल्या या सगळ्या नियोजनामुळे वयोवृद्ध लोकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे, त्यामुळे आम्हाला गावातच टुचुक करावे, अशी वयोवृद्ध ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

हेही वाचा: आजोबांचे कुटुंब उद्‌ध्वस्त ! तरी आठ दिवसांत त्यांनी केली कोरोनावर मात

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात लसीकरण व्हावे, अशी मागणी मी व माझ्या सहकाऱ्यांनी केलेली होती. यासंदर्भात तेथील अधिकाऱ्यांनी तुमच्या मागणीचा विचार करू, असे सांगितले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाच हजाराच्या पुढची लोकसंख्या असणाऱ्या गावात लसीकरण होईल अशी आशा मला वाटते.

- दादासाहेब बाबर, जिल्हा परिषद सदस्य, नाझरा