esakal | आजोबांचे हसते-खेळते कुटुंब उद्‌ध्वस्त ! तरी आठ दिवसांत त्यांनी केली कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

पंढरपूर शहरातील एका कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. बेड मिळेल या आशेने काहीजण घरातच थांबले आणि तोवर त्यांच्यातील आजार वाढतच गेला.

आजोबांचे कुटुंब उद्‌ध्वस्त ! तरी आठ दिवसांत त्यांनी केली कोरोनावर मात

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पंढरपुरातील एका कुटुंबातील सर्वच सदस्य कोरोना (Covid-19) पॉझिटिव्ह आले. त्यानंतर बेड उपलब्ध होत नसल्याने बरेचजण घरातच थांबले. काही दिवसांनी ते रुग्णालयात गेले, परंतु तोपर्यंत त्यांना काळाने गाठले होते. 90 वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली. परंतु, त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. तर दुसरा मुलगा आणि त्याची पत्नी कोरोनातून बरे झाले. (Three members of the same family in Pandharpur died due to Corona)

हेही वाचा: वडिलासह दोन कर्ती मुले कोरोनाने हिरावली ! अज्ञानांवर आले प्रपंचाचे ओझे

ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण वाढणाऱ्या तालुक्‍यात पंढरपूरचा समावेश आहे. या तालुक्‍यात आतापर्यंत 23 हजार 168 रुग्ण वाढले असून त्यातील 425 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, पंढरपूर शहरातील एका कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. पंढरपुरातील काही रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मात्र, रुग्णसंख्या वाढल्याने त्यांना बेड मिळत नव्हता. बेड मिळेल या आशेने काहीजण घरातच थांबले आणि तोवर त्यांच्यातील आजार वाढत गेला. त्या 90 वर्षीय आजोबाचा मुलगा, मुलगी यांचा आजार जास्तच बळावत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांची झुंज संपली आणि कोरोनाने त्यांचा बळी घेतला. तर त्या आजोबांच्या पत्नीला उशिरा का होईना, पण सोलापुरातील बॉईज हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला. परंतु, त्यांचाही मृत्यू झाला. आजोबा बॉईज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. त्यांनी जिद्द व चिकाटीतून कोरोनावर विजय मिळवत घर गाठले. काल (बुधवारी) ते तपासणीसाठी बॉईज हॉस्पिटलमध्ये आले होते.

हेही वाचा: शहरातील "हे' दोन प्रभाग हॉटस्पॉट ! जिल्ह्यात वाढले आज 905 रुग्ण

"त्या' मैत्रिणीमुळे मिळाला आजोबांना बेड

बॉईज हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लता पाटील यांच्या पंढरपूर येथील मैत्रिणीने बेड आहे का, अशी विचारणा केली. त्या वेळी त्यांनी सांगितले, शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने सध्या बेड उपलब्ध आहेत. त्यानंतर त्या आजोबांना व त्यांच्या पत्नीला बॉईज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आजोबांची पत्नी जास्तच सिरिअस असल्याने त्यांना वाचवता आले नाही. आजोबांना मात्र वाचवण्यात डॉक्‍टरांना यश मिळाले. दरम्यान, त्या आजोबांना त्यांच्या पत्नी व मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. आता आजोबांचा सांभाळ त्यांचा मोठा मुलगा व सून करीत असून त्यांच्यावर आता मरण पावलेल्या मुलगा व मुलीच्या नातवंडांची जबाबदारी आहे.