esakal | कोरोना बाधित मित्राच्या पत्नीवर पोलिस मित्राचा अत्याचार ! "तो' पोलिस निलंबित
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी संशयित आरोपीला पोलिस सेवेतून निलंबित केले आहे.

कोरोनाबाधित मित्राच्या पत्नीवर पोलिस मित्राचा अत्याचार ! "तो' पोलिस निलंबित

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पोलिसानेच (Police) सहकारी पोलिस मित्राच्या पत्नीसोबत जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना 23 मे रोजी घडली होती. या प्रकरणी त्या महिलेने फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांनी संशयित आरोपी रवी मल्लिकार्जुन भालेकर यास पोलिस सेवेतून निलंबित केले आहे. (Police friend tortures Corona-infected friend's wife)

हेही वाचा: आजोबांचे कुटुंब उद्‌ध्वस्त ! तरी आठ दिवसांत त्यांनी केली कोरोनावर मात

फौजदार चावडी पोलिस ठाण्यात भालेकर हा शिपाई पदावर कार्यरत होता. तत्पूर्वी, त्याने शहर वाहतूक शाखेतही काम केले आहे. त्याचा मित्र शहर पोलिस दलात असून तो सध्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने पोलिस मुख्यालयातील रुग्णालयात उपचार घेत होता. ही संधी साधून भालेकर हा त्या मित्राच्या घरी पोचला. मित्राची पत्नी घरात एकटीच होती. घरात गेल्यानंतर त्याने दरवाजाची आतून कडी लावून घेतली. त्या वेळी त्याने, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडतेस, असे म्हणून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर त्या पीडित महिलेने पोलिस ठाणे गाठले. संशयित आरोपी भालेकरला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयात हजर केले. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्‍विनी तळे या करीत आहेत. दरम्यान, कोरोनातून बरे होऊन पीडित महिलेचा पोलिस पती घरी परतला आहे. पीडित महिला आजारी असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: वडिलासह दोन कर्ती मुले कोरोनाने हिरावली ! अज्ञानांवर आले प्रपंचाचे ओझे

गुन्हा करणाऱ्यांना माफी नाहीच

पोलिस दलात काम करताना नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असते. त्यामुळे कायद्याच्या संरक्षणाचे काम करताना गुन्हेगारी वर्तन करणे, गुन्हेगारीला प्रोत्साहन देणे, गुन्हेगारासोबत अवैध व्यवसायात भागीदारी असणे, असे प्रकार खपवून घेतले जात नाहीत. अशा अनेकांवर आतापर्यंत निलंबन व बडतर्फीची कारवाई केली आहे. यापुढेही असे प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिला आहे.

महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

दुसऱ्या एका घटनेत महिलेशी अश्‍लील भाषेत बोलून लज्जा वाटेल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून संशयित आरोपी विठ्ठल दीक्षित (रा. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती वादावर तोडगा काढण्यासाठी गेलेल्या त्या महिलेला दीक्षितने ओढत घराबाहेर नेले आणि शिवीगाळ करीत अंगावरील साडी ओढली. तू पुन्हा घरी आलीस तर तुला खल्लास करेन, एका मुलीच्या संसार उद्‌ध्वस्त केला आहे, दुसऱ्या मुलीचा करायला वेळ लागणार नाही, अशी धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पेटकर हे करीत आहेत.