esakal | शहरात 18 एप्रिलपर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍तींना एकत्र फिरण्यास बंदी !
sakal

बोलून बातमी शोधा

Jamavbandi.j

सामाजिक सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या हेतूने पोलिस उपायुक्‍त बापू बांगर यांनी त्यासंदर्भात नवे आदेश काढले आहेत. 4 एप्रिलपासून हा आदेश लागू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शहरात 18 एप्रिलपर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍तींना एकत्र फिरण्यास बंदी !

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : धार्मिक सण, उत्सव, जयंती साजरे करणारे शहर म्हणून सोलापूरची राज्यात ओळख आहे. सभा, संप, आंदोलने, निर्दशनेही होतात. आगामी काळात गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, मराठा आरक्षणाला स्थगिती व शेती सुधारणाविषयक कायद्याविरोधात होणाऱ्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर 18 एप्रिलपर्यंत शहरात पाच अथवा त्याहून अधिक व्यक्‍तींना एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे. 

शहरात कोरोनाचाही प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दुकाने चालू-बंद करण्याची वेळ ठरवून देण्यात आली आहे. दुसरीकडे विविध आंदोलने, निर्दशने, मिरवणुका, सण-उत्सवाच्या माध्यमातूनही मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर सामाजिक सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या हेतूने पोलिस उपायुक्‍त बापू बांगर यांनी त्यासंदर्भात नवे आदेश काढले आहेत. 4 एप्रिलपासून हा आदेश लागू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विवाह समारंभ, अंत्ययात्रा, मिरवणुका, मोर्चे, रॅली, आंदोलने, निवेदन, धरणे व सभांसाठी सक्षम पोलिस प्राधिकरणाची परवानगी असलेल्यांना हा आदेश लागू होणार नाही, असेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. 

आदेशानुसार... 

इजा करण्यासाठी वापर होणारी शस्त्रे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, काठ्या अथवा झेंडा असलेल्या काठ्या बाळगण्यास असेल बंदी 

कोणताही ज्वालागृही, स्फोटक पदार्थ वाहतूक करणे, दगड अथवा तशा शस्त्रांचा साठा करण्यावर निर्बंध 

व्यक्‍ती अथवा प्रेताच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा देणे, गाणी म्हणणे अथवा वाद्य वाजविण्यावरही बंदी 

असभ्य हावभाव, भाषा वापरून निरनिराळ्या जमातींच्या भावना दुखावल्या जातील, अशा कृत्यांवरही बंदी 

बेशिस्तांना 70 हजारांचा दंड 
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, या उद्देशाने शहर पोलिसांकडून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. तरीही नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी शुक्रवारी 119 विनामास्क फिरणाऱ्यांकडून 59 हजार 500 रुपयांचा तर चार दुकानदारांकडून आठ हजार रुपयांचा आणि चार प्रवासी वाहनचालकांकडू दोन हजारांचा दंड वसूल केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image