Solapur News: सिव्हिल हॉस्पिटलमधील ‘त्या’ बाळांची आज ‘डीएनए’ टेस्ट; नर्सकडून बाळाची अदलाबदल झाल्याचे प्रकरण..

Baby Swap Mystery Deepens: त्या महिलेच्या नातलगांचे म्हणणे होते, आमच्या मुलीला मुलगी झाली आहे आणि तुम्ही आम्हाला मुलगा देत आहात. हा गोंधळ रुग्णालयाच्या अधिष्ठातांपर्यंत पोचला. त्यांनी चौकशीसाठी समिती नेमली असून दुसरीकडे बाळांची ‘डीएनए’ टेस्ट करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.
Civil Hospital on alert as DNA test begins in alleged baby swap case; nurse under scrutiny amid parents’ outrage.

Civil Hospital on alert as DNA test begins in alleged baby swap case; nurse under scrutiny amid parents’ outrage.

Sakal

Updated on

सोलापूर : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात बाळांची अदलाबदल झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. दोन्हीपैकी कोणते बाळ कोणत्या आईचे? हे शोधण्यासाठी त्यांची जनुकीय (डीएनए) चाचणी होईल. अधिष्ठातांनी सदर बझार पोलिसांत तक्रार दिली आहे. आता उद्या (गुरुवारी) दोन्ही बाळांची ‘डीएनए’ टेस्ट केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com