esakal | वडाळा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी! सिव्हिल सर्जनचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

वडाळा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी! सिव्हिल सर्जनचे आदेश

'क्‍लार्क गायब; सुरक्षारक्षक देतोय केसपेपर' या शीर्षकाने "ई-सकाळ'मधून वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले यांनी घेतली आहे.

वडाळा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी! सिव्हिल सर्जनचे आदेश

sakal_logo
By
दयानंद कुंभार

वडाळा (सोलापूर) : वडाळा (Wadala) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे परिसरातील नागरिकांना उपचारासाठी तिष्ठत थांबावे लागत असल्याने 'क्‍लार्क गायब; सुरक्षारक्षक देतोय केसपेपर' या शीर्षकाने 'ई-सकाळ'मधून वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले यांनी घेतली आहे. बाह्यरुग्ण विभाग उशिरा का सुरू केला जातो? कर्मचारी, अधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ का नाही? याबाबत संबंधित वडाळा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक अधिकारी यांनी ठोस कारवाई करावी व तसे आम्हाला कळवावे. आम्ही यावर तातडीने निर्णय घेऊ तसेच रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. यावर संबंधितांना नोटीस बजावणार आहे. तसेच कारभाराची चौकशी करण्याचे आदेश देणार असल्याचे 'सकाळ'शी बोलताना प्रदीप ढेले यांनी सांगितले .

हेही वाचा: सुरक्षारक्षक देतोय केसपेपर! वडाळा ग्रामीण रुग्णालयात क्लार्कची मनमानी

वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक अधिकारी डॉ. अविनाश घोरफडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले यांची भेट घेतली. ढेले यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करणार असल्याचे घोरपडे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: सीना नदीत वाहून गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेहच सापडला!

रुग्णवाहिका असून अडचण नसून खोळंबा ! सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचे हाल

वडाळ्यापासून जवळ असणाऱ्या खुनेश्वर येथील सुदाम महादेव चव्हाण (वय 65) या शेतकऱ्यास मंगळवारी दुपारी शेतात काम करत असताना सर्पदंश झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने वडाळा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले; मात्र तेथे नवी कोरी रुग्णवाहिका उभी असूनही चालकाअभावी पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करता आले नाही. या वेळी संबंधित शेतकऱ्यास पाऊण तास विव्हळत थांबावे लागले. नंतर शेळगाव येथून रुग्णवाहिकेस पाचारण करावे लागले. एकीकडे रुग्णवाहिकेस चालक नाही तर दुसरीकडे रुग्णालयात ओपीडी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यास यास जबाबदार कोण, असा सवाल विचारला जात आहे.

loading image
go to top