esakal | सुरक्षारक्षक देतोय केसपेपर! वडाळा ग्रामीण रुग्णालयात क्लार्कची मनमानी
sakal

बोलून बातमी शोधा

सुरक्षारक्षक देतोय केसपेपर! वडाळा ग्रामीण रुग्णालयात क्लार्कची मनमानी

वडाळा ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे परिसरातील रुग्णांना तिष्टत थांबावे लागत आहे.

सुरक्षारक्षक देतोय केसपेपर! वडाळा ग्रामीण रुग्णालयात क्लार्कची मनमानी

sakal_logo
By
दयानंद कुंभार

वडाळा (सोलापूर): सध्या थंडी, ताप, खोकला डासांच्या उपद्रव वाढल्याने रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे वडाळा ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे परिसरातील रुग्णांना तिष्टत थांबावे लागत आहे.

हेही वाचा: रेमडेसिव्हिरप्रकरणी वडाळा ग्रामपंचायतीची कोविड सेंटरला नोटीस

वडाळा ग्रामीण रुग्णालयात सकाळी साडे आठ ते साडेबारा पर्यंत बाह्य रुग्ण विभागाची वेळ असताना देखील येथी कर्मचारी केसपेपर विभाग तब्बल सकाळी दहा वाजल्यानंतर दाखल होतात. तोपर्यंत वडाळा परिसरातील नान्नज, दारफळ गावडी, पडसाळी, रानमसले, बीबीदारफळ रुग्ण केसपेपर कर्मचाऱ्याच्या प्रतिक्षेत विव्हळत बसतात. यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रोजी सकाळी दहा वाजता केसपेपर देण्यास सुरवात झाली.

हेही वाचा: वडाळा व वांगी ग्रामपंचायत सरपंचाची निवड होणार गुरुवारी

याबाबत अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. चक्क कार्तिक देवगण हा सुरक्षारक्षकच केसपेपर देत असल्याचे समोर आले आहे. तर केसपेपर काढण्यासाठी नियुक्ती असणारा क्लार्क अजय देशमुख केसपेपर काढण्यासाठी हजर होत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. तसेच सकाळी साडे दहा वाजता लॅब विभागातील कर्मचारी दाखल झाल्यानंतर कामकाजास सुरवात झाली. यामुळे येथे उपचारास येणाऱ्या रुग्णांना दीड तास डॉक्टर व कर्मचारी कधी येतात, याकडे डोळे लावून बसावे लागते. यासाठी याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: वडाळा बहिरोबा येथे दरोडा, लाखोंचा ऐवज लंपास

"सध्या क्लार्क अजय देशमुख केसपेपर काढण्यासाठी यांची नियुक्ती आहे. मात्र तेथे काम करण्यास नकार देत आहेत. यामुळे रुग्णांची हेळसांड टाळण्यासाठी नाईलाजास्तव सुरक्षारक्षकास केसपेपर देण्यासाठी पाचारण करावे लागते."

- डॉ.अविनाश घोरपडे, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक क्र.1

हेही वाचा: वडाळा बहिरोबा येथे दरोडा, लाखोंचा ऐवज लंपास

रुग्णवाहिका मिळाली पण चालक मिळेना...!

वडाळा ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहीका आ. यशवंत माने यांच्या फंडातून मिळाली आहे. मात्र शासनस्तरावरुन चालक नियुक्ती नसल्याने नवी कोरी रुग्णवाहिका पार्किंगमध्ये उभी आहे. रुग्णवाहिकेस चालक कधी मिळणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top