

Barshi Shocked as Young Cricketer Dies in Pitch Preparation Mishap
sakal
बार्शी शहर : येथील शिवशक्ती मैदानावर शनिवारी (ता. ३०) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा मैदान सपाट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन टन दगडी रोलरखाली चिरडून मृत्यू झाला. आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय १५) असे त्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी क्रिकेट शिबिराचे आयोजन करणाऱ्या मातृभूमी प्रतिष्ठानचे चालक, बार्शी तालुका क्रिकेट ॲकॅडमीचे संचालक तसेच दोन प्रशिक्षकांविरुद्ध बार्शी शहर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.