
सोलापूर : महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम ४.० सुरू करण्यात आली आहे. या चौथ्या टप्प्यात शहरातील एकूण ७८ रस्ते चकाचक होणार आहेत. १७ ते २७ जूनदरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर ओळख होण्यासाठी लोकसहभागातून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.