Devendra Fadnavis: पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी न्या: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रम

वातावरणात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून जल, वायू व वनराईचे महत्त्व समजून न घेतल्यास जग विनाशाकडे जाईल. त्यामुळे पर्यावरणाचा जागर हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती केली जात आहे.
CM Devendra Fadnavis Promotes ‘Environment Wari to Pandharpur’ Campaign
CM Devendra Fadnavis Promotes ‘Environment Wari to Pandharpur’ Campaignsakal
Updated on

पंढरपूर : ''पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी'' हा उपक्रम मागील १६ वर्षापासून अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे. या माध्यमातून आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पर्यावरण संवर्धनासाठी प्रबोधन केले जात आहे. आपल्या सर्व संतांनी पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धन करून जग वाचवण्याचा संदेश दिला. हा संदेशाचे अनुकरण करत सर्व विठ्ठलभक्तांनी वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com