
सोलापूर: कुर्डू (ता. माढा) येथील मुरुम उत्खननप्रकरणी अजित पवार आणि परिविक्षाधीन पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी झालेल्या संवादावरून देशभर चर्चा सुरू आहे. मंगळवारी (ता. ९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच यावर भाष्य केले. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागविल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.