

CM Devendra Fadnavis announces ₹500 crore for the Akkalkot pilgrimage development plan; key remarks on the Ladki Bheen scheme.
Sakal
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थांचे शक्तिपीठ असलेल्या अक्कलकोट शहरासाठी यापूर्वी तीर्थक्षेत्र विकास आराखडा केलेला होता. तो सुधारित करून ५०० कोटींचा विकास आराखडा तयार झाला असून त्यासाठी आम्ही पूर्ण मदत करणार आहोत. अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनी शहरात भाजपची सत्ता आल्यावर मी या शहराला निधीची कमतरता पडू देणार नाही, असे ठाम वचन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर प्रचार सभेत दिले.