Solapur : आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2 कार्यान्वित होण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे घालणार लक्ष

मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या "आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोन" कार्यान्वीत करण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले
CM Shinde will focus on implementation of Ashti Irrigation Scheme Phase 2
CM Shinde will focus on implementation of Ashti Irrigation Scheme Phase 2 Sakal

मोहोळ - मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या "आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोन" कार्यान्वीत करण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले असून, या संदर्भातील योग्य त्या सूचना संबंधित विभागाला त्यांनी दिल्या असल्याची माहिती शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी दिली.

दरम्यान योजना लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी खवणी, सारोळे, पोखरापूर, चिखली या चार गावच्या सरपंच उपसरपंच व शेतकऱ्यांनी जिल्हाप्रमुख चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री शिंदे यांना मुंबई येथे भेटून निवेदन दिले.

या संदर्भात माहिती देताना जिल्हाप्रमुख चवरे म्हणाले, तत्कालीन जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या कार्यकाळात ही योजना कार्यान्वीत व्हावी यासाठी प्रयत्न केला होता. तेव्हा काम सुरू झाले होते, मात्र मध्यंतरी च्या काही अडचणीमुळे ते थांबले होते.

ते काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना मुंबई येथे भेटून वस्तूस्थिती त्यांच्या कानावर घातली व निवेदन दिल्या नंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर वरील चार गावांचे सुमारे 9 हजार हेक्टर क्षेत्र ओलित्ता खाली येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात खरी हरित क्रांती होणार आहे. यावेळी सारोळ्याचे सरपंच शाहीर सलगर, पोखरापूरचे उपसरपंच आशिष आगलावे, खवणीचे सरपंच महादेव यमगर, रघुनाथ झांबरे, अनिल कदम, शंकर पाथरूट, तानाजी लादे, सुहास आवारे, कोमल महाराज कणसे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com