

CM’s Economic Advisor Praveensingh Pardeshi during a review meeting with Solapur Municipal officials, directing faster implementation of civic projects.
Sakal
सोलापूर : शहर पाणीपुरवठ्यासाठी ८९२ कोटी रुपये जागतिक बॅंकेकडून उपलब्ध करून देणे, शहरातील प्रस्तावित ९५० कोटींचे दोन उड्डाणपूल, १२५ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रकल्पातील पाणी कराराला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी महापालिका व जिल्हा प्रशासनाला दिल्या.