esakal | बैलपोळ्याच्या साहित्य विक्रीला बाजारात ठंडा प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्य विक्री

वाळूज : बैलपोळ्याच्या साहित्य विक्रीला बाजारात ठंड प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाळूज : पूर्वी केवळ बैलांच्या मेहनतीवर अवलंबून असलेल्या शेतीचे यांत्रिकीकरण आणि कोरोना चे संकट अजून टळले नसल्याने शेती मालाला बाजारात चांगला दर मिळत नसल्याने शेती आर्थिक संकटात सापडलेली आहे. त्यातच सलग दोन, तीन महिन्यापासून बाजार पेठेत वाढत असलेल्या इंधन दरवाढीच्या प्रभावामुळे बाजारातील सर्व वस्तूंचे दर वाढल्याने बैलपोळ्याच्या साहित्य खरेदी-विक्रीला शेतकऱ्यांकडून बाजारात 'ठंडा प्रतिसाद' मिळत आहे.

हेही वाचा: शाहू महाराजांच्या खासबागेची दुरावस्था; पाहा व्हिडिओ

बैलपोळा सण हा शेतकर्‍यांचा अत्यंत आवडता सण आहे.ज्याच्या जीवावर शेतीची मेहनतीची कामे वर्षभर करून घेतली जातात त्या सर्जा-राजाच्या कष्टातून उतराई होण्यासाठी शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो.त्यादिवशी बैलांना गोडधोड खाऊ घालतो.त्यांना सजवून त्यांची वाजतगाजत गावातून मिरवणूक काढतो.मात्र गेल्या दोन वर्षा पासून कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे हा सण धुमधडाक्यात साजरा केला जात नाही.

हेही वाचा: कोल्हापूरमध्ये मुलाने केली बापाची हत्या; पाहा व्हिडिओ

कोरोनाची दुसरी लाट थोड़ी ओसरल्यामुळे बाजाराने थोडी उसळी घेतली आहे.सोमवारी(ता.6)आलेल्या बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमिवर शनिवार आणि रविवारच्या ग्रामीणभागासह शहरात ठिकठिकाणच्या बाजारात बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य जसे:इंगूळ,सूत,सुताची दावी,विविध प्रकारच्या आणि रंगाच्या म्होरक्या, चंगाळ्या,गोंड्याच्या म्होरक्या,कासरे,विविध रंगाचे डबे,झुली,बैलांच्या शिंगांना लावण्यात येणारी बेगडं,झूली या रंगीबेरंगी साहित्यांची दुकाने बाजारात थाटली आहेत.मात्र अलीकडच्या काळात शेतीचे झालेले यांत्रिकीकरण आणि कोरोनाचे संकट अजून टळले नसल्याने आर्थिक संकटात सापडलेली शेती व शेतकरी आणि शेती मालावरील पुरक व्यावसाय अडचणीत सापडले आहेत. त्यातच सलग दोन,तीन महिन्यापासून वाढत असलेले इंधनाचे दर आणि याच्या प्रभावा मुळेही बैलपोळ्याच्या साहित्याचे दरही वाढले आहेत.

हेही वाचा: का होत आहे हार्ट अ‍ॅटॅकने तरुणांचा मृत्यू? जाणून घ्या, काय आहे कारण

इंधनाचे दर वाढल्याने बैल पोळ्यासाठीच्या साहीत्याच्या दरातही वाढ झाली आहे. याबाबत सय्यदवरवडे येथील बाजारात कुरुल येथील महादेव कांबळे यांनी पोळ्याच्या साहित्य विक्रीचे दुकान लावले होते.त्यांना साहित्याच्या किंमती व साहित्य खरेदीला मिळणारा प्रतिसाद याबद्दल विचारले असता त्यांनी सांगीतले की,"इंगूळ-20 रुपयाला छोटा डबा,बेगडी कागद 10 रुपये नग,म्होरकी- 40 रुपये,मोठागोंडा म्होरकी-100 रुपये, कासरा-40 रुपये,बैलाच्या गळ्यातील चंगाळी -500 रुपये याप्रमाणे दर आहेत.मात्र आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांकडून साहित्य खरेदीला कमी प्रतिसाद मिळत आहे."

"शेतीचे झालेले यांत्रिकीकरण,जनावरांचे बाजार बंद असल्याने वाढलेल्या किंमती तसेच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी यामुळे बैल पोळ्याच्या साहित्य खरेदी-विक्रीला शेतकऱ्यांकडून बाजारात कमी प्रतिसाद मिळत आहे."

- शिवाजी वाघमोडे,शेतकरी सय्यदवरवडे ता.मोहोळ.

loading image
go to top