esakal | का होत आहे हार्ट अ‍ॅटॅकने तरुणांचा मृत्यू? जाणून घ्या, काय आहे कारण
sakal

बोलून बातमी शोधा

का होत आहे हार्ट अ‍ॅटॅकने तरुणांचा मृत्यू? जाणून घ्या, काय आहे कारण

20 वर्षांपुढील तरुण हार्ट ऍटॅकचे सर्वाधिक बळी ठरत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंदविले आहे.

का होत आहे हार्ट अ‍ॅटॅकने तरुणांचा मृत्यू? जाणून घ्या, काय आहे कारण

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : व्यायामाला (Exercise) बगल अन्‌ आरामदायी जीवनशैलीतून लठ्ठपणा वाढू लागला आहे. बसल्या ठिकाणी रिमोटवरून सर्व गोष्टी हाताळल्या जात आहेत. दुसरीकडे, थोड्याशा अंतरावरील कामासाठी वाहनांचा वापर वाढला असून जंक फूडचा (Junk food) आहार घेतला जात आहे. ताणतणावही वाढल्याने आता 20 वर्षांपुढील तरुण हार्ट अ‍ॅटॅकचे (Heart attack) सर्वाधिक बळी ठरत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागाने (Department of Public Health) नोंदविले आहे.

हेही वाचा: सोलापूरच्या पुनर्वसन विभागात दलालांचा सुळसुळाट !

कोरोना काळात अनेकांची शुगर (मधुमेह) वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ज्या रुग्णांना मधुमेह व उच्च रक्‍तदाबाचा त्रास आहे, त्यांनाही हार्ट अ‍ॅटॅकचा धोका आहे. सध्या कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला असून, अनेकजण उच्च शिक्षणानंतरही जॉबच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोना काळात अनेकांच्या कामाचा व्याप वाढला आहे. दुसरीकडे, अनेकजण आजारापासून दूर राहण्यासाठी अतिव्यायाम करू लागले आहेत तर बहुतेक लोक व्यायाम करतच नाहीत, असे चित्र आहे. लहान मुलांमध्येही लठ्ठपणा, स्थूलपणा वाढला असून मैदानी खेळांची त्यांच्यात आवड दिसून येत नाही. मोबाईल व संगणकीय खेळाकडे त्यांचा कल सर्वाधिक आहे. नियमित व्यायाम न करणे आणि अचानकपणे अतिव्यायाम करण्यामुळेही हार्ट अ‍ॅटॅक येऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. ताणतणाव प्रचंड वाढला असून कामाच्या व्यापामुळे पौष्टिक आहार घेतला जात नाही. तेलकट, मसालेदार पदार्थ, जंक अन्‌ फास्ट फूडचा आहारात वापर वाढला आहे. स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायलासुद्धा अनेकांना वेळ नाही. त्यामुळे हृदयविकार, श्‍वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे तरुणही हार्ट अ‍ॅटॅकचे सर्वाधिक बळी ठरत आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. साधना तायडे यांनी दिली.

ताणतणाव, फास्ट फूडचा वापर, तेलकट पदार्थांचा आहारात अतिवापर, मैदानी खेळांचा विसर, मोबाईल, संगणकाचा अतिवापर केल्याने लठ्ठपणा, स्थूलपणा वाढला आहे. या सर्व बाबींमुळे मागील दोन-तीन वर्षांत तरुणांचेही हार्ट अ‍ॅटॅकमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

- डॉ. साधना तायडे, संचालिका, आरोग्य सेवा, मुंबई

हेही वाचा: 'या' आठ पदार्थांमधून मिळतात बहुतांश पोषक तत्त्वे! आहारात करा समावेश

हार्ट अ‍ॅटॅकची प्रमुख कारणे...

 • पंखा, टीव्ही, एसी, संगणक चालू करण्यासाठी रिमोटचा वापर

 • कमी अंतरावर काम असतानाही वाहनांचा वापर केला जातोय

 • कामाचा तणाव वाढला, आहारात जंक फूडचा सर्वाधिक वापर

 • बॉडी बिल्डिंगसाठी सिरॉईडचा वाढला वापर; प्रोटिनचाही वापर वाढला

 • प्रदूषण, नियमित व्यायाम नाही, एकदम अतिव्यायाम करणे, मधुमेह, बीपी वाढला

 • लठ्ठपणा, स्थूलपणा वाढला; कोरोनामुळे रक्‍ताच्या गुठळ्या होऊन रक्‍ताभिसरणाची समस्या

हार्ट अ‍ॅटॅकपासून बचावासाठी उपाय...

 • नियमित काही अंतर चालावे, व्यायामाची सवय असावी

 • सिरॉईड, प्रोटिनचा आहारात अधिक प्रमाणात वापर नकोच

 • अल्कोहोल, सिगारेट, तंबाखूचे सेवन बंद करावे, तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावेत

 • मैदानी खेळांची असावी आवड, लठ्ठपणा, स्थूलपणा वाढू देऊ नये

 • कोरोनानंतर किमान चार महिने रक्‍त पातळ होण्यासाठी करावा ऍस्पिरिनचा वापर

 • उसळ, वरण, मासे, मटन, चिकनचा आहारात समतोल वापर असावा; धूम्रपान नकोच

loading image
go to top