

पंढरपूर : कार्तिकी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकऱ्यांचे पंढरपुरात आगमन होणार आहे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात. तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी (ता. २७) सोयी-सुविधांची पाहणी केली.