esakal | 16 सप्टेंबरपासून सुरू होतील शहर-जिल्ह्यातील महाविद्यालये! इंग्रजी न झेपणाऱ्यांचा 'आर्टस्‌'ला प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

16 सप्टेंबरपासून सुरू होतील शहर-जिल्ह्यातील महाविद्यालये!

अनेक विद्यार्थ्यांना 65 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळाले. परंतु, इंग्रजी, गणित आणि विज्ञानची डोकेदुखी वाटणाऱ्यांनी कला शाखेलाच पसंती दिली, असेही चित्र पाहायला मिळाले.

16 सप्टेंबरपासून सुरू होतील शहर-जिल्ह्यातील महाविद्यालये!

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी (Third Merit List) सोमवारी प्रसिद्ध झाली. त्यामध्ये दोन्ही यादीत नंबर न लागलेल्या, 55 ते 65 टक्‍क्‍यांपर्यंत गुण मिळालेल्या बहुतेक विद्यार्थ्यांनी इंग्रजी झेपणार नाही म्हणून कला शाखेला (Arts)) प्रवेश घेतल्याचे निरीक्षण माध्यमिक शिक्षण विभागाने नोंदविले आहे. दुसरीकडे, तीन-चार विद्यार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांपर्यंत गुण असतानाही त्यांनी स्पर्धा परीक्षेचे स्वप्न पाहून कला शाखा निवडली, असेही दिसून आले. दरम्यान, 16 सप्टेंबरपासून शहर-ग्रामीणमधील अकरावीचे वर्ग सुरू होतील. सर्वांनी कोरोनाच्या (Covid-19) नियमावलीचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अशोक भांजे (Ashok Bhanje) यांनी केले आहे.

हेही वाचा: NEET ची अ‍ॅन्सर की अन्‌ परीक्षा निकालाच्या या आहेत संभाव्य तारखा!

जिल्ह्यात कला (Arts), शास्त्र (विज्ञान) आणि वाणिज्य (कॉमर्स) या शाखांचे एकूण 428 महाविद्यालये आहेत. त्या ठिकाणी कला शाखेची प्रवेश क्षमता 36 हजार 171 आहे. तर वाणिज्य शाखेची प्रवेश क्षमता 11 हजार 328 असून विज्ञान शाखेची प्रवेश क्षमता 29 हजार 237 एवढी आहे. अकरावी प्रवेशासाठी 8 सप्टेंबरपर्यंत तीन गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्या. काही महाविद्यालयांनी प्रवेश रिक्‍त राहतील म्हणून सुरवातीपासूनच गुणवत्तेनुसार स्पॉट ऍडमिशेन दिले. आता प्रवेशाच्या तिन्ही गुणवत्ता याद्या प्रसिद्ध होऊनही तिन्ही शाखांच्या विशेषत: कला शाखेच्या सर्वाधिक जागांवर विद्यार्थीच मिळालेले नाहीत. जिल्हाभरात अंदाजित 12 हजारांपर्यंत जागा रिक्‍त राहिल्या असून ग्रामीणमधील काही महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेला विद्यार्थी मिळालेले नाहीत. कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा होऊ शकली नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची मागील गुणवत्ता पाहून त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात अनेक विद्यार्थ्यांना 65 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळाले. परंतु, इंग्रजी, गणित आणि विज्ञानची डोकेदुखी वाटणाऱ्यांनी कला शाखेलाच पसंती दिली, असेही चित्र पाहायला मिळाले.

हेही वाचा: डीटीई महाराष्ट्रने जाहीर केली एसएससी डिप्लोमाची अंतिम गुणवत्ता यादी!

गुरुवारपासून अकरावीचे ऑफलाइन वर्ग

अकरावी प्रवेशासाठी एकूण तीन गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीच्या शाखेला प्रवेश घेतला आहे. यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून आला. अकरावी प्रवेशाची अंतिम मुदत 15 सप्टेंबरपर्यंत असल्याने विद्यार्थ्यांनी मुदतीत प्रवेश घ्यावा, असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अशोक भांजे यांनी केले आहे. दरम्यान, 16 सप्टेंबरपासून शहर-ग्रामीणमधील अकरावीचे वर्ग सुरू होतील. सर्वांनी कोरोनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गर्दी होऊ न देता काही तास कॉलेज सुरू राहील, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी प्राचार्यांना सांगितले.

loading image
go to top