esakal | डीटीई महाराष्ट्रने जाहीर केली एसएससी डिप्लोमाची अंतिम गुणवत्ता यादी!
sakal

बोलून बातमी शोधा

डीटीई महाराष्ट्रने जाहीर केली एसएससी डिप्लोमाची अंतिम गुणवत्ता यादी!

तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र (DTE) ने एसएससी पदविका प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादी 2021 जाहीर केली आहे.

डीटीई महाराष्ट्रने जाहीर केली एसएससी डिप्लोमाची अंतिम गुणवत्ता यादी!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र (Directorate of Technical Education, Maharashtra - DTE) ने एसएससी पदविका (SSC Diploma) प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादी 2021 (Merit List) जाहीर केली आहे. अंतिम गुणवत्ता यादीसह प्रवेश प्राधिकरणाने एसएससीनंतरच्या डिप्लोमासाठी तात्पुरत्या श्रेणीनुसार जागा देखील अधिसूचित केल्या आहेत. उमेदवार आता dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर अंतिम गुणवत्ता यादीद्वारे त्यांची निवड स्थिती तपासू शकतात.

हेही वाचा: 'ECIL'मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 16 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

अशी तपासा अंतिम गुणवत्ता यादी

अंतिम गुणवत्ता यादी तपासण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट dtemaharashtra.gov.in ला भेट द्यावी. पुढे, मेन पेजवर उपलब्ध पोस्ट एसएससी डिप्लोमा प्रवेश 2021-22 लिंकवर क्‍लिक करा. आता एक नवीन टॅब उघडेल. येथे महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय व जम्मू -काश्‍मीर आणि लडाख उमेदवारांसाठी अंतिम गुणवत्ता यादीचे स्वतंत्र लिंक दिलेले आहेत. उमेदवारांनी आपल्याशी संबंधित लिंकवर क्‍लिक करावे. आता पीडीएफ स्वरूपात गुणवत्ता यादी नवीन पेजवर खुली होईल. उमेदवार त्यांच्या अर्ज आयडी आणि नावानुसार अंतिम गुणवत्ता यादी तपासू शकतात. आवश्‍यक असल्यास हे पेज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

हेही वाचा: अकरावी प्रवेशाची तिसरी कटऑफ यादी जाहीर! 'या' वेबसाईटवर तपासा

कॅप राउंड -1 ऑप्शन फॉर्म ऑनलाइन भरण्याची तारीख आणि पुष्टीकरण 13 ते 16 सप्टेंबर 2021 पर्यंत निश्‍चित करण्यात आले आहे. फेरी 1 साठीची तात्पुरती वाटप यादी 18 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे आणि उमेदवारांना 23 सप्टेंबरपर्यंत संबंधित संस्थेत पोचावे लागेल. महाविद्यालये आवश्‍यक कागदपत्रांची पडताळणी करतील आणि नंतर उमेदवारांचे प्रवेश ऑनलाइन प्रणालीमध्ये अपलोड करतील.

हे लक्षात घ्यावे की, महाराष्ट्र राज्य/ अखिल भारतीय/ जम्मू -काश्‍मीर आणि लडाख उमेदवारांसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी 9 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली. तर, उमेदवारांना 12 सप्टेंबर 2021 पर्यंत तात्पुरती गुणवत्ता यादीमध्ये दाखवलेल्या आकडेवारीत आवश्‍यक दुरुस्तीबद्दल तक्रार करण्याची संधी देण्यात आली होती. डीटीई महाराष्ट्र 2021 मेरिट लिस्टच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

loading image
go to top